अरबाज खानच्या घरातून बाहेर पडताना दिसली मलायका अरोरा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2017 11:45 IST2017-05-11T06:15:21+5:302017-05-11T11:45:21+5:30
अरबाज खान व मलायका अरोरा आता विभक्त झाले आहेत, हे आपण जाणतोच. सध्या हे कपल घटस्फोटावरून चर्चेत असते. अशात ...

अरबाज खानच्या घरातून बाहेर पडताना दिसली मलायका अरोरा!
अ बाज खान व मलायका अरोरा आता विभक्त झाले आहेत, हे आपण जाणतोच. सध्या हे कपल घटस्फोटावरून चर्चेत असते. अशात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत, ते फोटो काहीसे आश्चर्यचकित करणारे आहे. हे फोटो पाहिल्यानंतर अरबाज व मलायका या दोघांमध्ये सगळे काही आॅल-वेल आहे, असेच तुम्हालाही वाटेल.
![]()
![]()
अरबाजपासून विभक्त झाल्यानंतर मलायकाची सक्रियता आधीपेक्षा बरीच वाढली आहे. आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत ती आधीपेक्षा अधिक वेळ घालवू लागली आहे. मस्तपैकी पार्ट्या एन्जॉय करणे, मनाला आनंद देतील, अशा गोष्टी करणे, असे सगळे सगळे मलायका अधिक सक्रियपणे करू लागली आहे. अलीकडे एका मुलाखतीत मलायका एक खूप महत्त्वाची गोष्ट बोलून गेली होती. मी मनात कुठलीही अशी गोष्ट ठेवू इच्छित नाही, जी माझ्यातील नकारात्मकतेचे कारण ठरेल, असे तिने सांगितले होते. अरबाजच्या घरातून बाहेर पडतानाचे मलायकाचे हे फोटो कदाचित असेच काही सांगणारे आहेत. तूर्तास या फोटोंवरून काहीही अंदाज काढता येणार नाही. अलीकडे बॉलिवूड एक्स कपल्स एकमेकांसोबत प्रचंड कॅज्युअल झाले आहेत. कदाचित अरबाजच्या घरातून बाहेर पडतानाचा मलायकाचा आनंदी चेहराही याचाच एक भाग असेल.
![]()
ALSO READ : मलायका अरोरा व अर्जुन कपूर यांची ‘पार्टी अंडर दी सेम रूफ’!
मलायका एका चौदा वर्षाच्या मुलाची आई आहे .अनेकदा ती आपल्या मुलासोबत क्वालिटी टाईम घालवताना दिसते. काल बुधवारीच मलायका, अरबाज आपल्या मुलासोबत व खान कुटुंबातील इतर सदस्यांसोबत जस्टीन बीबरचा लाईव्ह कॉन्सर्ट पाहण्यासाठी पोहोचले होते. यावेळी ती आणि अरबाज दोघेही अतिशय चीअरफुल मूडमध्ये दिसले. गेल्या वर्षभरापासून मलाइका पती अरबाज खानपासून विभक्त राहत आहे. दोघांनीही घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केला आहे.