‘मुबारकाँ’ मध्ये अर्जुनचा दुहेरी अवतार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 13:51 IST2016-11-24T13:41:42+5:302016-11-24T13:51:00+5:30

अर्जुन कपूर हा सध्या ‘ हाफ गर्लफ्रेंड ’ मध्ये जरी बिझी असला तरी त्याचा आगामी चित्रपट ‘ मुबारकाँ ’ ...

Arjun's double incarnation in 'Mubarakan' | ‘मुबारकाँ’ मध्ये अर्जुनचा दुहेरी अवतार!

‘मुबारकाँ’ मध्ये अर्जुनचा दुहेरी अवतार!

्जुन कपूर हा सध्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ मध्ये जरी बिझी असला तरी त्याचा आगामी चित्रपट ‘मुबारकाँ’ मुळे तो चांगलाच चर्चेत आलाय. या चित्रपटात पहिल्यांदाच तो त्याचा काका अनिल कपूरसोबत स्क्रिन शेअर करतोय. यूएसमधील त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग त्याने संपवले असून तो आता दुसऱ्या शेड्यूलसाठी शूटिंग करतोय. नुकतेच त्याने चित्रपटातील दुहेरी भूमिकेचा फर्स्ट लुक सोशल मीडियावर लाँच केला. करणवीर सिंग आणि चरणवीर सिंग या जुळ्या भावांची ही कथा आहे. दोघांच्या सारखेपणामुळे होणारा गोंधळ कॉमेडीच्या रूपात प्रेक्षकांना पहावयास मिळेल. 

अर्जुन कपूरला घरातूनच एक फिल्मी वातावरण लाभलेले आहे. त्याचे काका अनिल कपूर, बहीण सोनम कपूर, करिना कपूर, आणि कपूर कुटुंबीय यामुळे त्याचा बॉलिवूडमधील डेब्यू फार काही कौतुकाचा भाग नव्हता. मात्र, तरीही त्याने ‘गुंडे’,‘तेवर’,‘फार्इंडिंग फॅनी’,‘२ स्टेट्स’,‘औरंगजेब’, ‘ईशकजादे’ चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय साकारला. हटके कथानक, अभिनयाची जादू, चित्रपट निवड, अ‍ॅक्शन, रोमँटिक चित्रपट अशी व्हर्सेटॅलिटी त्याने आत्तापर्यंत दाखवून दिली. 

कुठल्या दोन अभिनेत्री ‘मुबारकाँ’तील मुख्य भूमिकेत दिसणार? यासाठी प्रचंड चर्चा मध्यंतरी सुरू होती. दिग्दर्शक अनीस बाजमी यांच्या हटके कथानकावरील चित्रपटात आता इलियाना डिक्रुझ आणि अथिया शेट्टी असणार यावर शिक्कामोर्तब केले आहे. पाहूयात, अर्जुन कपूरचा हा परफेक्ट ‘रॉमकॉम’ चाहत्यांना किती आवडतो ते लवकरच कळेल!










 
  

Web Title: Arjun's double incarnation in 'Mubarakan'