अरेच्चा ! पेहचान कौन, लॉकडाऊनमध्ये बदलला या अभिनेत्याचा लुक, चेहरामोहरा इतका बदलला की चाहतेही नाही ओळखणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 17:11 IST2020-05-18T17:09:05+5:302020-05-18T17:11:42+5:30

लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढले आहे. आता आणखीन काही काळ मी वाट बघू शकत नाही. लॉकडाऊनमुळे बाहेर पडण्याचा तर प्रश्नच नाही. माझा असा अवतार आता मला पहावत नाही.असे अर्जुन गॅब्रिएलाशही बोलताना दिसत आहे. 

Arjun rampal look get change in lockdown period see video-SRJ | अरेच्चा ! पेहचान कौन, लॉकडाऊनमध्ये बदलला या अभिनेत्याचा लुक, चेहरामोहरा इतका बदलला की चाहतेही नाही ओळखणार

अरेच्चा ! पेहचान कौन, लॉकडाऊनमध्ये बदलला या अभिनेत्याचा लुक, चेहरामोहरा इतका बदलला की चाहतेही नाही ओळखणार

आतापर्यंत अभिनेत्रींचे नो- मेकअप लूक व्हायरल होत असत. त्यांच्या फोटोंना पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत. आता नेटीझन्सने आपला मोर्चा अभिनेत्यांकडे वळवला आहे. असेही काही अभिनेते आहेत. ज्यांच्यामध्ये कमालीचा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर अभिनेता अर्जुन रामपालचा एक फोटो व्हायरल होत आहे. यात त्याचा झालेला अवतार पाहून त्याला ओळखणेही कठिण  झाले आहे. फोटोप्रमाणेच त्याचा  एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

लॉकडाऊनमुळे सलून जीम सगळंच बंद असल्यामुळे घरातच आहे त्या परिस्थीत सेलिब्रेटी राहत आहेत. घरातच व्यायाम, हेअर कटिग करत आहेत. इतरांना पाहून अर्जुनदेखील घरीच हेअरकट करतोय. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे त्याची दाढी आणि डोक्यावरचे केस वाढले आहेत आणि तो दाढी आणि केस कापण्याविषयी आपल्या गर्लफ्रेंडसोबत बोलत आहे.

अर्जुन आपल्या वाढलेल्या दाढी आणि केसांंमुळे खूप त्रस्त आहे. त्यातच आता लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढले आहे. आता आणखीन काही काळ मी वाट बघू शकत नाही. लॉकडाऊनमुळे बाहेर पडण्याचा तर प्रश्नच नाही. माझा असा अवतार आता मला पहावत नाही.असे अर्जुन गॅब्रिएलाशही बोलताना दिसत आहे.

 

तसेच लॉकडाऊन जाहिर झाले तेव्हा देखील अर्जुनने एक पोस्ट चाहत्यांसह शेअर केली होती, त्यात त्याने म्हटले होते की, प्रेयसी गैब्रिएला आणि सात महिन्यांच्या मुलासोबत कर्जतमध्ये अडकलोआहे.लॉकडाऊन घोषित व्हायच्याआधी मी एका सिनेमाचे शूटिंग कर्जतमध्ये करत होतो. त्यामुळे आता मी शूटिंग लोकेशनवरच अडकलो आहे.

Web Title: Arjun rampal look get change in lockdown period see video-SRJ