अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेन्डचा बोल्ड अवतार, दोन महिन्यांपूर्वी दिला बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 11:13 IST2019-10-04T11:13:00+5:302019-10-04T11:13:29+5:30

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेन्ड गॅब्रिएला डेमिट्रिएड्स सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. गत 18 जुलैला गॅब्रिएलाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आणि अर्जुन तिस-यांदा बाबा झाला.

arjun rampal girlfriend gabriella demetriades shares glamorous photo |  अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेन्डचा बोल्ड अवतार, दोन महिन्यांपूर्वी दिला बाळाला जन्म

 अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेन्डचा बोल्ड अवतार, दोन महिन्यांपूर्वी दिला बाळाला जन्म

ठळक मुद्दे गॅब्रिएला एक आफ्रिकी मॉडेल आहे. ‘सोनाली केबल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेन्ड गॅब्रिएला डेमिट्रिएड्स सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. गत 18 जुलैला गॅब्रिएलाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आणि अर्जुन तिस-यांदा बाबा झाला. बाळाच्या जन्मानंतर उण्यापु-या दहाच दिवसांत गॅब्रिएला तिच्या जुन्या शेपमध्ये परतली होती.  वर्कआऊटनंतरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत ती एकदम फिट दिसली होती.  हा फोटो पाहिल्यानंतर तिने खरंच काही दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिला आहे, यावर अनेकांचा विश्वास बसेना. तूर्तास गॅब्रिएलाने असाच एक ग्लॅमरस फोटो तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. ओपन बटन डेनिम जॅकेट आणि जीन्स असा तिचा अंदाज आहे.


‘लवकरच येतेय, एका नव्या लूकमध्ये....,’ असे तिने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे.


गॅब्रिएला ही अर्जुनची गर्लफ्रेन्ड असून दोघांचे अजून लग्न झालेले नाही. याचे कारण म्हणजे, अर्जुन व त्याची पत्नी मेहर यांचा अद्याप कायदेशीर घटस्फोट झालेला नाही. पण त्याआधी अर्जुन व गॅब्रिएला यांच्या मुलाचा जन्म झाला आहे.


अर्जुनला पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. मेहर जेसिका आणि अर्जुनने एकमेकांसोबत २० वर्ष संसार केला. पत्नी मेहर जेसिकासोबत विभक्त झाल्यानंतर अर्जुन गॅब्रिएलात गुंतला. हळूहळू दोघेही एकमेकांच्या जवळ आलेत. यानंतर अनेक इव्हेंटला दोघे एकत्र दिसू लागले.  गॅब्रिएला एक आफ्रिकी मॉडेल आहे. ‘सोनाली केबल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. पण बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. 

Web Title: arjun rampal girlfriend gabriella demetriades shares glamorous photo