बॉलिवूडचा हा अभिनेता तिसऱ्यांदा झाला बाबा, लग्नाआधीच दिली गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 19:55 IST2019-07-18T19:54:18+5:302019-07-18T19:55:42+5:30

बॉलिवूडच्या या अभिनेत्यानं स्वतः सोशल मीडियावर आपली गर्लफ्रेंड प्रेग्नेंट असल्याचं सांगितलं होतं.

arjun rampal girlfriend gabriella blessed with baby boy | बॉलिवूडचा हा अभिनेता तिसऱ्यांदा झाला बाबा, लग्नाआधीच दिली गुड न्यूज

बॉलिवूडचा हा अभिनेता तिसऱ्यांदा झाला बाबा, लग्नाआधीच दिली गुड न्यूज

अर्जुन रामपालने काही दिवसांपूर्वी त्याची गर्लफ्रेन्ड गॅब्रिएला ही प्रेग्नंट असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर त्यांच्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू झाल्या. इतकंच नाही तर बेबी शॉवरचे फोटो देखील सोशल मीडियावर पहायला मिळाले होते. नुकतेच गॅब्रिएला, अर्जुन आणि त्याचे आई-वडिल हिंदुजा हॉस्पिटालला जाताना दिसले होते. त्यानंतर आता अर्जुन रामपाल बाबा झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

अर्जुनला पूत्र रत्न झाल्याचे समोर आले आहे. अर्जुनच्या दोन्ही मुली देखील नव्या पाहुण्याला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या आहेत. अर्जुनचे संपूर्ण कुटुंब नव्या पाहुण्याच्या येण्याने आनंदी असल्याचं म्हटले जात आहे.

अर्जुन आणि मेहर यांचा अद्याप कायदेशीररित्या घटस्फोट झाला नसून अर्जुन गॅब्रिएलासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. आता गॅब्रिएलाला पूत्र रत्न प्राप्त झाला आहे. गॅब्रिएलाच्या प्रेग्नेसीविषयी कोणतीही तक्रार नसल्याचे मेहरने सांगितले होते. त्यामुळे गॅब्रिएलाच्या डोहाळजेवणामध्ये मेहरचे महत्वाचे योगदान होते.

अर्जुनला पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. त्यांची नावं माहिका आणि मायरा आहेत. मेहर जेसिका आणि अर्जुनने एकमेकांसोबत 20 वर्ष संसार केला. पत्नी मेहर जेसिकासोबत घटस्फोट झाल्यानंतर अर्जुन गॅब्रिएलात गुंतला. हळूहळू दोघेही एकमेकांच्या जवळ आलेत. यानंतर अनेक इव्हेंटला दोघेही एकत्र दिसू लागलेत.   


गेल्या काही महिन्यांपासून अर्जुन त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत बिनधास्तपणे मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत होता. गॅब्रिएला एक आफ्रिकी मॉडेल आहे.

‘सोनाली केबल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. 

Web Title: arjun rampal girlfriend gabriella blessed with baby boy