हा कोण हॉलिवूड स्टार आला? अर्जुन रामपालचा नवा लुक पाहून चाहतेही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 10:15 IST2021-06-18T10:12:49+5:302021-06-18T10:15:49+5:30

अर्जुन रामपाललाओळखणं मुश्किल! अर्जुनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून चाहतेही हैराण झालेत.

Arjun Rampal appears in platinum blonde hair avatar, fans confuses | हा कोण हॉलिवूड स्टार आला? अर्जुन रामपालचा नवा लुक पाहून चाहतेही हैराण

हा कोण हॉलिवूड स्टार आला? अर्जुन रामपालचा नवा लुक पाहून चाहतेही हैराण

ठळक मुद्देलवकरच अर्जुन ‘धाकड’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात कंगना राणौत लीड रोलमध्ये आहे. 1 आॅक्टोबर 2021 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल ( Arjun Rampal ) याला पाहाल तर ओळखणं मुश्किल होईल. होय, त्याचा नवा लुक आहेच तसा. या लुकमध्ये अर्जुन पहिल्या नजरेत ओळखणेही कठीण आहे.
अर्जुनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून चाहतेही हैराण झालेत. हा कुणी हॉलिवूड स्टार आहे, असेच अनेकांना वाटले. पण तो निघाला अर्जुन रामपाल. (Arjun Rampal appears in platinum blonde hair avatar )

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने अर्जुनचा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात अर्जुन प्लॅटिनम ब्लाँड हेअरमध्ये दिसतोय. सेलिब्रिटी हेअर ड्रेसर आलिम हाकीम याने अर्जुनला हा नवा लुक दिला. अर्जुनच्या या नव्या लुकवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

‘हा अर्जुन रामपाल आहे, मला तर कुणी हॉलिवूड स्टार वाटला,’ असे एका युजरने त्याच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना लिहिले. एका युजरने त्याच्या हेअर कलरचे कौतुक केले. अनेक चाहत्यांना त्याचा हा लुक आवडला. झक्कास, कुल असे लिहून काहींनी आनंद व्यक्त केला. अर्थात काहींनी मात्र त्याचा हा नवा लुक पाहून नाकं मुरडलं. भारतीय काळ्या केसांमध्येच चांगले दिसतात. हा आता फॉरेनर वाटतोय, असे एका युजरने लिहिले. आता या मुलगा याला ओळखतो की नाही मला शंका आहे, असे लिहित एका युजरने अर्जुनच्या नव्या लुकची मजा घेतली.

अर्जुनचा हा नवा लुक कशासाठी आहे, हे तूर्तास कळू शकलेले नाही. त्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ओटीटीवर रिलीज झालेल्या ‘नेल पॉलिश’ या सीरिजमध्ये तो अखेरचा दिसला होता. लवकरच तो ‘धाकड’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात कंगना राणौत लीड रोलमध्ये आहे. 1 ऑक्टोबर 2021 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: Arjun Rampal appears in platinum blonde hair avatar, fans confuses