अर्जुन रामपाल व गॅब्रिएलाने काय ठेवले आपल्या बाळाचे नाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 15:30 IST2019-07-28T15:30:00+5:302019-07-28T15:30:02+5:30

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल तिस-यांदा बाबा झाला. गत 18 जुलैला त्याची गर्लफ्रेन्ड गॅब्रिएला डेमिट्रिएड्सने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्माने अर्जुन व गॅब्रिएला जाम खुश आहेत. आता अर्जुन व गॅब्रिएलाच्या मुलाचे नामकरणही झाले आहे.

arjun rampal and gabriella demetriades name their baby boy arik | अर्जुन रामपाल व गॅब्रिएलाने काय ठेवले आपल्या बाळाचे नाव?

अर्जुन रामपाल व गॅब्रिएलाने काय ठेवले आपल्या बाळाचे नाव?

ठळक मुद्देगॅब्रिएला एक आफ्रिकी मॉडेल आहे.‘सोनाली केबल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल तिस-यांदा बाबा झाला आहे. त्याची गर्लफ्रेन्ड गॅब्रिएला डेमिट्रिएड्सने गत 18 जुलैला एका गोंडस मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्माने अर्जुन व गॅब्रिएला जाम खुश आहेत. आता अर्जुन व गॅब्रिएलाच्या मुलाचे नामकरणही झाले आहे. होय, मुलाच्या जन्माच्या 10 दिवसांनंतर अर्जुनने त्याचा एक क्यूट फोटो शेअर करत, त्याच्या नावाची घोषणा केली आहे. 
‘याने माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आणले. आमच्या आयुष्यात नवा प्रकाश आणला. याच्या येण्याने आमचे जग नव्या रंगांनी न्हाऊन निघाले. ज्युनिअर रामपाल तुझे आमच्या आयुष्यात स्वागत आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादासाठी आभार. एरिक रामपालकडून तुम्हा सर्वांना हॅलो, ’ असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे. यावरून अर्जुन व गॅब्रिएलाने आपल्या बाळाचे नाव ‘एरिक’ ठेवल्याचे कळतेय.


गॅब्रिएला ही अर्जुनची गर्लफ्रेन्ड आहे. दोघांचेही लग्न झालेले नाही. अर्जुन आणि त्याची पत्नी मेहर  यांचा अद्याप कायदेशीररित्या घटस्फोट झाला नसून अर्जुन गॅब्रिएलासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. आता गॅब्रिएलाला पूत्र रत्न प्राप्त झाला आहे.  


अर्जुनला पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. मेहर जेसिका आणि अर्जुनने एकमेकांसोबत 20 वर्ष संसार केला. पत्नी मेहर जेसिकासोबत विभक्त झाल्यानंतर अर्जुन गॅब्रिएलात गुंतला. हळूहळू दोघेही एकमेकांच्या जवळ आलेत. यानंतर अनेक इव्हेंटला दोघेही एकत्र दिसू लागलेत. 


 गेल्या काही महिन्यांपासून अर्जुन त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत बिनधास्तपणे मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत होता. गॅब्रिएला एक आफ्रिकी मॉडेल आहे. ‘सोनाली केबल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. पण बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. 

Web Title: arjun rampal and gabriella demetriades name their baby boy arik