अर्जुन कपूरच्या बहिणीनं शेअर केला स्विमसूटमधील फोटो, ट्रान्सफॉर्मेशन पाहून हैराण झाले चाहते

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 11:36 IST2022-09-17T11:35:39+5:302022-09-17T11:36:01+5:30

Anshula Kapoor :अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. तिचे हैराण करणारे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते चकीत झाले आहेत.

Arjun Kapoor's sister shared a swimsuit photo, fans were shocked to see the transformation | अर्जुन कपूरच्या बहिणीनं शेअर केला स्विमसूटमधील फोटो, ट्रान्सफॉर्मेशन पाहून हैराण झाले चाहते

अर्जुन कपूरच्या बहिणीनं शेअर केला स्विमसूटमधील फोटो, ट्रान्सफॉर्मेशन पाहून हैराण झाले चाहते

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर(Arjun Kapoor)ची बहीण अंशुला कपूर (Anshula Kapoor) सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. तिचे हैराण करणारे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते चकीत झाले आहेत. ती तिच्या नवीन आणि लेटेस्ट फोटोंनी चाहत्यांची मने जिंकत आहेत. दरम्यान नुकतेच अंशुला कपूरने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर नवीन फोटो शेअर केला आहे. या फोटोत अंशुलाला ओळखणेही कठीण झाले आहे.  स्विमसूट घातलेली अंशुला पूलच्या काठावर बसलेली दिसते आहे. तिची ही स्टाइल चाहत्यांना खूप आवडली आहे.

अंशुला कपूरने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अंशुला कपूर ब्लू रंगाच्या स्विमसूटमध्ये दिसत आहे. या फोटोतील तिचा ग्लॅमरस अवतार पाहून चाहतेही हैराण झाले आहेत.

यावर एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले की, काय आहे, तू खूप सुंदर दिसत आहेस. तर दुसऱ्या युजरने विचारले की, इतका बदल कसा काय झाला. बहीण खुशी, अनुष्का शर्मा, तारा सुतारिया यांनीही या फोटोवर कमेंट करत अंशुलाचे कौतुक केले आहे.


अंशुलाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अंशुला कपूरने हृतिक रोशनच्या HRX कंपनीतही काम केले आहे. यासोबतच तिने अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये ऑपरेटिंग मॅनेजर म्हणून काम केले आहे.

Web Title: Arjun Kapoor's sister shared a swimsuit photo, fans were shocked to see the transformation