पहिल्यांदाच मलायका अरोरासोबत स्टेज शेअर करणार अर्जुन कपूरचे वडील बोनी कपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 03:27 PM2023-11-27T15:27:41+5:302023-11-27T15:28:07+5:30

डान्स रिएलिटी शो झलक दिखला जा ११ (Jhalak Dikhala Ja 11) दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत चालला आहे. या शोमध्ये आमिर अली बाहेर पडला आहे.

Arjun Kapoor's father Boney Kapoor will share the stage with Malaika Arora for the first time | पहिल्यांदाच मलायका अरोरासोबत स्टेज शेअर करणार अर्जुन कपूरचे वडील बोनी कपूर

पहिल्यांदाच मलायका अरोरासोबत स्टेज शेअर करणार अर्जुन कपूरचे वडील बोनी कपूर

डान्स रिएलिटी शो झलक दिखला जा ११ (Jhalak Dikhala Ja 11) दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत चालला आहे. या शोमध्ये आमिर अली बाहेर पडला आहे. या सीझनमध्ये शोमधून बाहेर पडणारा तो पहिला स्पर्धक आहे. या शोमध्ये फराह खान, मलायका अरोरा आणि अर्शद वारसी जज आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोमध्ये एक स्पेशल गेस्ट येणार आहेत.  पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, निर्माते बोनी कपूर शोमध्ये एन्ट्री घेणार आहेत. ते शोमधील पहिले गेस्ट असणार आहेत. जर बोनी कपूर यांनी शोमध्ये हजेरी लावली तर ते पहिल्यांदाच मलायका अरोरासोबत स्टेज शेअर करणार आहे. शोमध्ये बोनी कपूर हजेरी लावणार आहेत, या वृत्ताला अद्याप त्यांच्याकडून दुजोरा मिळालेला नाही.

मलायका अरोरा ही बोनी कपूर यांचा मुलगा आणि अभिनेता अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड आहे. अर्जुन आणि बोनी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांनी त्यांचे नाते अधिकृतही केले होते. मात्र, त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येत होत्या, मात्र त्यानंतर अर्जुन आणि मलायका एकत्र स्पॉट झाले होते. दोघेही एकत्र क्वालिटी टाइम व्यतित करताना दिसले. अर्जुन आणि मलायकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

बोनी कपूर यांनी श्रीदेवीसोबत केले होते दुसरे लग्न

बोनी कपूर यांच्याबद्दल सांगायचे तर ते बॉलिवूडचे लोकप्रिय निर्माते आहेत. त्यांचा विवाह अभिनेत्री श्रीदेवीशी झाला होता. बोनी आणि श्रीदेवी यांना जान्हवी आणि खुशी कपूर या दोन मुली आहेत. जान्हवीने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. खुशी द आर्चीज या चित्रपटातून डेब्यू करणार आहे. श्रीदेवीच्या आधी बोनीचे लग्न मोनाशी झाले होते. बोनी यांना मोनापासून दोन मुले आहेत, एक मुलगा अर्जुन आणि मुलगी अंशुला कपूर. अर्जन कपूर हा एक बॉलिवूड अभिनेता आहे. तर अंशुलाने स्वतःला ग्लॅमर जगापासून दूर केले आहे.

Web Title: Arjun Kapoor's father Boney Kapoor will share the stage with Malaika Arora for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.