क्या से क्या हो गए ... ; अर्जुन कपूरचा नवा लूक पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 15:16 IST2019-09-06T15:12:40+5:302019-09-06T15:16:10+5:30

अर्जुन-मलायका बॉलिवूडच्या सर्वाधिक चर्चित कपलपैकी एक आहे. त्यांची जितकी चर्चा होते, तितकेच ते ट्रोलही होतात.

arjun kapoor trolled for french beard photo netizens makes fun of malaika arora | क्या से क्या हो गए ... ; अर्जुन कपूरचा नवा लूक पाहिलात का?

क्या से क्या हो गए ... ; अर्जुन कपूरचा नवा लूक पाहिलात का?

ठळक मुद्देअर्जुन-मलायका यापूर्वीही अनेकदा ट्रोल झाले आहेत. दोघांच्या वयात बरेच अंतर आहे.

अर्जुन कपूर नुकताच एका रोमॅन्टिक डेटवरून परतला. मलायका अरोरासोबतची त्याने एन्जॉय केलेली ही ट्रीप आणि या ट्रीपच्या फोटोंची चांगलीच चर्चा झाली. अर्जुन-मलायका बॉलिवूडच्या सर्वाधिक चर्चित कपलपैकी एक आहे. त्यांची जितकी चर्चा होते, तितकेच ते ट्रोलही होतात. शुक्रवारी अर्जुनने एक फोटो शेअर केला आणि तो ट्रोल झाला. होय, अर्जुनने फ्रेंच दाढीतील नव्या लूकचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा फोटो पाहून चाहत्यांनी अर्जुनची चांगलीच मजा घेतली.

‘फ्रेंच टोस्ट नहीं तो फ्रेंड बीयर्डही सही...,’ असे हा फोटो शेअर करताना अर्जुनने लिहिले. त्याचा हा फोटो पाहून कमेंट्सचा जणू पूर आला. काही जणांनी तर अगदी वाईट पद्धतीने अर्जुनला ट्रोल केले. ‘इससे घटिया अ‍ॅक्टर देखा किसी ने?’असे एका एका युजरने लिहिले. तर अन्य एका युजरने ‘क्या से क्या हो गए आंटी के चक्कर में...,’ असे लिहित अर्जुनची खिल्ली उडवली.

एकाने ‘असे फोटो पोस्ट करण्याआधी तू अभिनेता आहेस, याचे तर भान ठेव,’असे लिहिले. एकाने तर अर्जुनचा हा फोटो ‘गर्लिश’ असल्याचे म्हटले. ‘हमारी गोलू आंटीजी कैसी हैं, मल्ला आंटी’, असे एकाने कमेंट करताना लिहिले.


अर्जुन-मलायका यापूर्वीही अनेकदा ट्रोल झाले आहेत. दोघांच्या वयात बरेच अंतर आहे. एवढेच नाही तर मलायका घटस्फोटित आणि एका तरूण मुलाची आई आहे. ट्रोलर्स अनेकदा मलायका व अर्जुनच्या नात्याची टर उडवतात. अर्थात काही या नात्याची प्रशंसा करणारेही आहेत.
नुकतेच मलायका-अर्जुन आॅस्ट्रियाच्या ट्रिपवर गेले होते. येथील अनेक रोमॅन्टिक फोटो दोघांनी शेअर केले होते.

Web Title: arjun kapoor trolled for french beard photo netizens makes fun of malaika arora