कपूर घराण्यातल्या 'या' अभिनेत्यावरही आली होती 'डिस्पोजेबल प्लेट्समध्ये जेवायची वेळ', वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 11:29 IST2020-11-02T11:21:59+5:302020-11-02T11:29:22+5:30

कोरोनामुळे 21 दिवस वाया गेले, पण जीव महत्त्वाचा. मात्र आता मी खूपच खबरदारी घेत आहे. पुन्हा आजारी व्हायचे नाही आणि मला पुन्हा कोरोना रुग्ण व्हायचे नाही.

Arjun Kapoor Shared His Bad Experience Of Being Corona Positive, Said 'Used To Eat Food In Disposable Plates | कपूर घराण्यातल्या 'या' अभिनेत्यावरही आली होती 'डिस्पोजेबल प्लेट्समध्ये जेवायची वेळ', वाचा सविस्तर

कपूर घराण्यातल्या 'या' अभिनेत्यावरही आली होती 'डिस्पोजेबल प्लेट्समध्ये जेवायची वेळ', वाचा सविस्तर

काही दिवसांपूर्वीच अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्यामुळे अर्जुन कपूर चांगलाच धास्तावला होता. कोरोनामुक्त झाल्यानंतरही अर्जुन कपूर अजूनही मानसिक दृष्ट्या बरा झालेला नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने याविषयी सांगितले आहे. कोरोना आपल्याला होणार नाही, असे  जे विचार करतात ते फार चुकीचे आहे. थोडेसे दुर्लक्ष केल्याने कोरोना होवू शकतो.

सावधगिरी बाळगणे फार गरजेचे आहे. ज्यांना वाटते त्यांना कोरोना होणार नाही अशांना माझी विनंती आहे की,  स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची योग्य काळजी घ्या. कोरोना खूपच धोकादायक आहे. कोरोना झाला हे स्वीकारण्यास मला सहा ते आठ तास लागले. मला खूप सौम्य लक्षणे होती, म्हणून सर्व काही ठीक झाले.

 

नशिबाने बहिण अंशुलाही घरीच होती. तिने माझ्या आयसोलेशनची तयारी केली. मी एका बंदिस्त खोलीतच राहिलो, कोणाच्याही संपर्कात मी येणार नाही. याची मी पुरेपुर काळजी घेतली.  माझे जेवणाची भांडी आणि बाथरून मी स्वतःच स्वच्छ करायचो. डिस्पोजेबल प्लेट्समध्ये जेवायचो. व्हिडिओ कॉलिंगद्वारे डाॅक्टरांकडून उपचार घेत होतो.

कोरोनामुळे 21 दिवस वाया गेले, पण  शेवटी जीव  महत्त्वाचा. आता मी खूपच खबरदारी घेत आहे. पुन्हा आजारी पडायचे नाही. कोरोना खरंच खूप घातक आहे.  जे तरुण कोरोना होणार नाही असा विचार करून बिनधास्त बाहेर फिरतात तर ते फार मोठी चूक करत आहेत. वेळीच सावध होणे हाच एक पर्याय आहे. त्यामुळे जास्त गर्दीत जाणे टाळा,  शक्य असेल तितके घरातच आपल्या कुटुंबियांसोबत वेळ एन्जॉय करा. 

खबरदार! अजिबात भेटायचं नाही मलायकाला, अशी सलमानने अर्जुन कपूरला दिली होती सक्त ताकीद

मलायका अरोरा आणिअर्जुन कपूर यांच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत येत असतात. बऱ्याचदा ते एखाद्या इव्हेंट किंवा रेस्टॉरंटबाहेर स्पॉट होतात. ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. या लग्नासाठी तिचा मुलगा अरहानचीदेखील परवानगी असल्याचे समजते आहे. मात्र या नात्यामुळे अर्जुन कपूर आणि सलमान खान यांच्या नात्यात फूट पडली आहे.

मलायका अरोराने 2017 साली अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यावर त्यांच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. पण असेही सांगितले जाते की अरबाज आणि मलायकाचे लग्न तुटू नये म्हणून खान कुटूंबाने खूप प्रयत्न केले होते. इतकंच नाही तर सलमान खान आणि सोहेल खानने स्वतः जाऊन अर्जुन कपूरला सक्त ताकीद दिली होती की तू कधीच मलायकाला भेटायचे नाही. 

Web Title: Arjun Kapoor Shared His Bad Experience Of Being Corona Positive, Said 'Used To Eat Food In Disposable Plates