तुझी नवीन आई आली, जेव्हा श्रीदेवीच्या नावाने अर्जुन कपूरला शाळेत चिडवायची मुलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 19:37 IST2021-07-03T19:31:00+5:302021-07-03T19:37:32+5:30

लग्नाआधीच प्रेग्नंट राहिलेल्या श्रीदेवी यांच्यासाठीच बोनी कपूर यांनी पहिल्या पत्नीला सोडून दुसरे लग्न केले. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांना जान्हवी कपूर आणि खुशी कपूर दोन मुली आहेत.

Arjun Kapoor Revealed School Friends Was Tease Him About His New Mom Sridevi | तुझी नवीन आई आली, जेव्हा श्रीदेवीच्या नावाने अर्जुन कपूरला शाळेत चिडवायची मुलं

तुझी नवीन आई आली, जेव्हा श्रीदेवीच्या नावाने अर्जुन कपूरला शाळेत चिडवायची मुलं

बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूर छैय्या छैच्या गर्ल मलायका अरोरासह अफेअरच्या चर्चांमुळे सतत चर्चेत असतो. अर्जुन त्याच्या फिल्मी करिअरपेक्षा खासगी कारणांमुळेच जास्त चर्चेत असतो. तसेच अर्जुन अनेकदा याविषयी बिनधास्त बोलताना दिसतो. पुन्हा एकदा त्याने त्याच्या बालपणी घडलेला किस्सा सांगितला आहे.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे बॉलिवूड निर्माते बोनी कपूरसह दुसरे लग्न झाले होते. विशेष म्हणजे विवाहीत असूनही बोनी कपूर श्रीदेवीच्या प्रेमात पडले होते. बोनी कपूर यांचे पहिले लग्न वयाच्या 28 व्या मोना शौरीसोबत झाले होते. या दोघांना अर्जुन कपूर आणि अंशुला ही दोन मुलं.बोनी कपूर यांचे पहिल्या पत्नीसह 13 वर्षे लग्न टिकले होते. 

लग्नाआधीच प्रेग्नंट राहिलेल्या श्रीदेवी यांच्यासाठीच बोनी कपूर यांनी पहिल्या पत्नीला सोडून दुसरे लग्न केले. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांना जान्हवी कपूर आणि खुशी कपूर दोन मुली आहेत. बोनी कपूर यांच्या दुस-या लग्नामुळे अर्जुन आणि अंशुला यांनाही त्रास सहन करावा लागला होता. मोना यांनी एकटीनेच दोन्ही मुलांचा सांभाळ केला. त्यामुळे मानसिक दृष्ट्या मुलांना फार काही सहन करावे लागले होते. 

अर्जुन कपूर शाळेत शिकत असताना शाळेत मुलं श्रीदेवी यांच्या नावाने त्याला चिडवायचे असे खुद्द अर्जुनेच एका मुलाखतीत सांगितले आहे.आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यामुळे प्रचंड तणावातून जावं लागल्याचे त्याने सांगितले. त्यातही वडील एक प्रसिद्ध व्यक्ती होते आणि ज्या महिलेसोबत त्यांनी दुसरे लग्न केलं ती त्यावेळची भारतातील सर्वात मोठी सुपरस्टार होती. दोघेही प्रतिष्ठीत व्यक्ती होते. त्यांच्या अशा वागण्यामुळेच बालपणच खूप कठीण गेले.

बोनी कपूर यांच्या दुस-या लग्नामुळे अर्जुन कपूर आणि बोनी कपूर यांच्या नात्यांवरही त्याचा परिणाम झाला होता.पण श्रीदेवी यांचं २०१८ साली निधन झाल्यानंतर  अर्जुननं वडील आणि श्रीदेवी यांच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशी यांना आधार दिला. अनेकदा बोनी कपूर आपल्या चारही मुलांबरोबर क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसतात. 

Web Title: Arjun Kapoor Revealed School Friends Was Tease Him About His New Mom Sridevi