मलायकाच्या मॉम-डॅडसोबत अर्जुन कपूरने केली पार्टी, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 11:01 IST2019-12-27T11:00:35+5:302019-12-27T11:01:16+5:30

अर्जुन कपूर व मलायका अरोरा यांचे नाते कुणापासूनही लपून राहिलेले नाही. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत, हेही नव्याने सांगण्याची गरज नाही.

arjun kapoor met malaika arora mother on christmas | मलायकाच्या मॉम-डॅडसोबत अर्जुन कपूरने केली पार्टी, पाहा फोटो

मलायकाच्या मॉम-डॅडसोबत अर्जुन कपूरने केली पार्टी, पाहा फोटो

ठळक मुद्देअर्जून व मलायकाची रोमॅन्टिक केमिस्ट्री सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

अर्जुन कपूरमलायका अरोरा यांचे नाते कुणापासूनही लपून राहिलेले नाही. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत, हेही नव्याने सांगण्याची गरज नाही. हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. अर्थात दरवेळी या सगळ्या अफवा असल्याचे सांगून अर्जुन व मलायका या चर्चा धुडकावून लावतात. पण आता हे नाते बरेच पुढे गेले आहे. केवळ मलायका-अर्जुन यांच्यातच नाही तर एकमेकांच्या कुटुंबाशीही दोघांची जवळीक वाढत आहेत. होय, अर्जुनने मलायकाच्या मॉम डॅडसोबत ख्रिसमस साजरा केला, यातच सगळे आले.

ख्रिसमसनिमित्त मलायकाच्या आईच्या घरी एक छोटीशी पार्टी आयोजित केली गेली होती. मलायका व अर्जुन दोघेही एकत्र या पार्टीला पोहोचले. दोघेही वेगवेगळ्या कारमध्ये आलेत. पण दोघांनीही एकत्र घरात एन्ट्री घेतली. याचे काही फोटो समोर आले आहेत. 


याआधीही अर्जुन मलायकाच्या मॉम डॅडच्या घरी त्यांना भेटायला गेला होता.
कपूर कुटुंबाने आधीच मलायका व अर्जुनच्या नात्याला परवानगी दिली आहे. आता कदाचित अरोरा कुटुंबानेही हे नाते मान्य केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मलायका व अर्जुनचे नाते आॅफिशिअल झाले तर आश्चर्य वाटायला नको.


अर्जून व मलायकाची रोमॅन्टिक केमिस्ट्री सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. सुरुवातीला दोघांनीही आपले नाते जगापासून लपवून ठेवले. पण अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अगदी बिनधास्त अर्जुनसोबत फिरू लागली.


त्यानंतर करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये मलायकाने अर्जुनवरच्या प्रेमाची अप्रत्यक्षपणे कबुली दिली होती. पाठोपाठ अर्जुन कपूरनेदेखील याच चॅट शोमध्ये अप्रत्यक्षपणे लग्नाचेही संकेत दिले होते. शोचा होस्ट करण जोहरने अर्जुनला त्याच्या रिलेशनशिप स्टेट्सविषयी प्रश्न विचारला असता मी सिंगल नाही, असे अर्जुन म्हणाला होता.   

Web Title: arjun kapoor met malaika arora mother on christmas