मुंबई स्टेशनवरचा तो फोटो पाहून भावूक झालेत मलायका अरोरा-अर्जुन कपूर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 16:35 IST2021-02-05T16:33:18+5:302021-02-05T16:35:23+5:30

मी तुझ्या भावना समजू शकते भावा, असे लिहित मलायकाने हा फोटो शेअर केला.

arjun kapoor malaika arora shares viral photo of worshiping man of mumbai local train | मुंबई स्टेशनवरचा तो फोटो पाहून भावूक झालेत मलायका अरोरा-अर्जुन कपूर, म्हणाले...

मुंबई स्टेशनवरचा तो फोटो पाहून भावूक झालेत मलायका अरोरा-अर्जुन कपूर, म्हणाले...

ठळक मुद्देअर्जुन कपूर व मलायका अरोरा हे कपल सतत अफेअरच्या चर्चेमुळे लाईमलाईटमध्ये असते. एक व्हॅकेशनचा रोमॅन्टिक फोटो शेअर करत अर्जुन व मलायकाने आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली होती.

कोरांना महामारीच्या पार्श्वभूमीवर जवळपास 11 महिन्यांनी मुंबईकरांनी जीवनवाहिनी असलेली लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू झाली आणि अनेक मुंबईकर चाकरमान्यांना गहिवरून आले. लोकलमध्ये चढण्याआधी एका प्रवाश्याने चक्क लोकलच्या दारावर डोकं ठेवून नमस्कार केला. कोणीतरी हा फोटो कॅमेरात कैद केला आणि त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या फोटोने अनेकांनी मने जिंकलीत. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरमलायका अरोरा त्यापैकीच एक.
मुंबईच्या चाकरमान्याचा हा फोटो पाहून मलायका व अर्जुन दोघेही भावूक झालेत. दोघांनीही वेगवेगळ्या कॅप्शनसह आपल्या सोशल अकाऊंटवर हा फोटो शेअर केला.

अर्जुनने लिहिले,
अनेक गोष्टी नीट होत नसल्याचे जेव्हा तुम्हाला वाटू लागेल, तेव्हा क्षणभर थांबा... आपल्यापैकी अनेक नशीबवान लोक आहेत, ज्यांनी काही कठीण महिने काढलेत. सगळे काही खुले झाल्यावर कसे काम करणार, याची चिंता न करता त्यांनी खूप काही सोसले, अशा कॅप्शनसह अर्जुन कपूरने लोकलच्या दारावर माथं टेकवणाºया तरूणाचा फोटो शेअर केला.

मलायकाही झाली भावूक...
हा फोटो माझ्या मनाला स्पर्शून गेला. मी तुझ्या भावना समजू शकते भावा, असे लिहित मलायकाने हा फोटो शेअर केला.

अर्जुन कपूर व मलायका अरोरा हे कपल सतत अफेअरच्या चर्चेमुळे लाईमलाईटमध्ये असते. एक व्हॅकेशनचा रोमॅन्टिक फोटो शेअर करत अर्जुन व मलायकाने आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. त्याआधी करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये मलायकाने अर्जुनवरच्या प्रेमाची अप्रत्यक्षपणे कबुली दिली होती. पाठोपाठ अर्जुन कपूरनेदेखील याच चॅट शोमध्ये अप्रत्यक्षपणे लग्नाचेही संकेत दिले होते. शोचा होस्ट करण जोहरने अर्जुनला त्याच्या रिलेशनशिप स्टेट्सविषयी प्रश्न विचारला असता मी सिंगल नाही, असे अर्जुन म्हणाला होता. अर्जुन व मलायकाच्या वयात बरेच अंतर आहे. पण जगाची पर्वा न करता दोघेही प्रेमात पडले आणि कालांतराने जाहिरपणे आपल्या प्रेमाची कबुलीही दिली. . मलायका व अर्जुन लवकरच लग्न करणार असल्याचे मानले जात आहे.

Web Title: arjun kapoor malaika arora shares viral photo of worshiping man of mumbai local train