अर्जुन कपूर लग्नाबाबत केला हा खुलासा, वाचून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 17:02 IST2018-08-16T16:51:40+5:302018-08-16T17:02:48+5:30

अर्जुन कपूर नेहमीच त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफला घेऊन चर्चेत राहिला आहे. अर्जुनची सध्या चांगली फॅन फॉलोईंग आहे. अर्जुन नुकताच त्याच्या लग्नबाबत खुलासा केला.  

Arjun kapoor give unbelievable explanation about marriage+ | अर्जुन कपूर लग्नाबाबत केला हा खुलासा, वाचून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

अर्जुन कपूर लग्नाबाबत केला हा खुलासा, वाचून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

ठळक मुद्देअर्जुनचा 'नमस्ते इंग्लंड' सिनेमा लवकरच रिलीज होणार आहेयात तो पुन्हा एकदा परिणीती चोप्रासोबत दिसणार आहे

अर्जुन कपूर नेहमीच त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफला घेऊन चर्चेत राहिला आहे. अर्जुनची सध्या चांगली फॅन फॉलोईंग आहे. अर्जुन नुकताच त्याच्या लग्नबाबत खुलासा केला.  मीडिया रिपोर्टनुसार अर्जुन कपूर अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूर आणि अर्जुनची लहान बहीण अंशुलाच्या लग्नानंतर लग्ना करण्याच्या विचारात आहे. त्याला नाही माहिती की या सगळ्या गोष्टींना किती वेळ लागणार आहे. कदाचित चार ते सहा वर्षसुद्धा लागू शकतात.  


लवकरच अर्जुनचा 'नमस्ते इंग्लंड' सिनेमा रिलीज होणार आहे. नमस्ते इंग्लंड' हा चित्रपट रोमँटिक कॉमेडी असून या चित्रपटाची कथा दोन प्रेमीयुगुलांभोवती फिरते. ‘नमस्ते इंग्लंड’ची धूरा सांभाळणाऱ्या विपुल शाह यांनी यापूर्वी 'नमस्ते लंडन' या चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते. दिग्दर्शक विपुल शाहने पंजाबमधील वेगवेगळ्या लोकेशनवर शूट करण्यात आले आहे. जो आजपर्यंत बॉलिवूडमध्ये दाखवण्यात आलेले नाहीत. ढाका, पॅरिस, लंडनसारख्या शहरांमध्ये चित्रपटाची शूटिंग झाल्याचे सूत्रांकडून समजते आहे.


विपुल अमृतलाल शाह दिग्दर्शित 'नमस्ते इंग्लंड' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर अर्जुन आणि परिणीती दोघांनीही हे पोस्टर शेअर केले होते. अभिनेता अर्जुन कपूर व अभिनेत्री परिणीती चोप्रा यांनी 'इश्कजादे' चित्रपटातून बॉलिवूडमधील करियरला सुरूवात केली होती. या चित्रपटातील त्यांची प्रेमकथा प्रेक्षकांना भावली होती आणि या जोडीने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. 

Web Title: Arjun kapoor give unbelievable explanation about marriage+