OMG ! मलायकासोबत लग्नासाठी नाही तर या अभिनेत्रीसोबत शूटिंग करण्यासठी एक्सायडेट आहे अर्जुन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 14:10 IST2020-01-07T14:07:41+5:302020-01-07T14:10:43+5:30

याचा खुलासा अर्जुनने स्वत: त्याच्या इन्स्टास्टोरीवर केला आहे.

Arjun kapoor cannot wait to start shooting for his next film | OMG ! मलायकासोबत लग्नासाठी नाही तर या अभिनेत्रीसोबत शूटिंग करण्यासठी एक्सायडेट आहे अर्जुन

OMG ! मलायकासोबत लग्नासाठी नाही तर या अभिनेत्रीसोबत शूटिंग करण्यासठी एक्सायडेट आहे अर्जुन

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा गेल्या महिन्यात रिलीज झालेल्या पानीपत सिनेमात दिसला होता. अर्जुन कपूर गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या मलायकासोबतच्या लग्नाच्या चर्चेला घेऊन प्रकाशझोतात आहे. अर्जुन आणि मलायकच्या लग्नाबाबत रोज नवा खुलासा होत असतो. अर्जुन सध्या आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी उत्सुक आहे. याचा खुलासा अर्जुनने स्वत: त्याच्या इन्स्टास्टोरीवर केला आहे. या इन्स्टा स्टोरीवर लिहिले आहे की, लवकरात लवकर पुन्हा शूटिंग सुरु करणे गरजेचे आहे.   


काही दिवसांपूर्वी अर्जून कपूरने आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवर काही फोटो शेअर केले होते. यात त्याच्यासोबत सहअभिनेत्री रकुलप्रीत सिंग दिसली होती. यात दोघे फनी पोज देताना दिसतायेत. 


अर्जुन आणि रकुलप्रीत ज्या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. त्या सिनेमाचे नाव अजून ठरलेले नाही. हा एक कॉमेडी ड्रामा सिनेमा असणार आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार लवकरच या सिनेमाचे शूटिंग सुरु होणार आहे. पंजाब आणि लॉस एंजेलिसमध्ये शूटिंग होणार असल्याची माहिती आहे. 


अर्जुन कपूरनं काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत त्याचा मलायकासोबतचा लग्नाचा प्लान शेअर केला होता. यासोबतच त्याचं लग्न गुपचूप होणार नसल्याचंही त्यानं स्पष्ट केलं होतं. अर्जुन म्हणला, सध्या तरी आमचा लग्नाचा कोणताही विचार नाही. पण जेव्हा मी लग्न करेन तेव्हा सर्वांना बोलवणार. माझी पूर्ण फॅमिली बिग फॅट वेडिंगमध्ये विश्वास ठेवते. त्यामुळे माझं लग्न छोट्या स्वरुपात होणार नाही. त्यामुळे आता जेव्हा अर्जुनचं लग्न होईल तेव्हा त्याबद्दल सर्वांना समजेल हे नक्की.

Web Title: Arjun kapoor cannot wait to start shooting for his next film