अर्जुन कपूरने मलायका अरोरासोबतच्या लग्नाबाबत तोडली चुप्पी, म्हणाला, मला असंच जगायचंय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 12:25 IST2019-05-20T12:24:47+5:302019-05-20T12:25:47+5:30

अभिनेता अर्जुन कपूर व मलायका अरोरा यांच्या अफेयर व लग्नाची चर्चा वारंवार होताना ऐकायला मिळते.

Arjun Kapoor broke the silence about marriage with Malaika Arora, said, 'I want to live like this | अर्जुन कपूरने मलायका अरोरासोबतच्या लग्नाबाबत तोडली चुप्पी, म्हणाला, मला असंच जगायचंय

अर्जुन कपूरने मलायका अरोरासोबतच्या लग्नाबाबत तोडली चुप्पी, म्हणाला, मला असंच जगायचंय

अभिनेता अर्जुन कपूरमलायका अरोरा यांच्या अफेयर व लग्नाची चर्चा वारंवार होताना ऐकायला मिळते. मात्र दोघांच्या लग्नाबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या लग्नाच्या चर्चा वारंवार मीडियामध्ये ऐकायला मिळतात. दोघांच्या लग्नाबाबत अर्जुन कपूरला विचारले असता त्याने सांगितले की, लग्नाबाबतीत चर्चा होने स्वाभाविक आहे. कारण माझे मित्रमंडळी लग्न करून वैवाहिक जीवन जगत आहेत. त्यामुळे मला लग्नाबाबत विचारले ही काय मोठी गोष्ट नाही.


आईएएनएसच्या वृत्तानुसार, अर्जुन कपूरला लग्नाबाबत विचारले असता अर्जुन कपूर म्हणाला की, माझ्या लग्नाला घेऊन सध्या खूप चर्चा आहे आणि ही चर्चा होणे स्वाभाविकच आहे. कारण माझ्या मित्रांचे लग्न झालेले आहेत. त्यामुळे सर्वांना वाटते की मी लग्न केले पाहिजे. 


सुरूवातीच्या दिवसांत अर्जुन व मलायकाने आपले नाते लपवून ठेवले होते. मात्र तसे काही नाही कारण नेहमी पार्टी व एअरपोर्ट ते दोघे एकत्र पहायला मिळतात. 


अर्जुन कपूर म्हणाला, मी माझ्या खासगी जीवनात खूप खूश आहे आणि मला असेच जीवन व्यतित करायचे आहे. गेल्या काही महिनांपासून मी बरेच काही लपवून ठेवले आहे, ज्यावेळी सांगण्यासारखे असेल तेव्हा नक्कीच याबद्दल सांगेन. 


अर्जुन कपूर राजकुमार गुप्ताच्या इंडियाज मोस्ट वॉण्टेड या चित्रपटात तो गुप्त अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

हा चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Arjun Kapoor broke the silence about marriage with Malaika Arora, said, 'I want to live like this