मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपच्या वृत्तावर अर्जुन कपूरनं सोडलं मौन; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 16:08 IST2022-01-13T16:08:27+5:302022-01-13T16:08:54+5:30

अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) ४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. पण अचानक त्यांच्या ब्रेकअपचे वृत्त येऊ लागल्या. ज्यावर अर्जुन कपूरने आता मौन ,सोडले आहे.

Arjun Kapoor breaks silence on news of breakup with Malaika Arora; Said ... | मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपच्या वृत्तावर अर्जुन कपूरनं सोडलं मौन; म्हणाला...

मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपच्या वृत्तावर अर्जुन कपूरनं सोडलं मौन; म्हणाला...

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांच्या ब्रेकअपच्या वृत्तांनी सोशल मीडियावर जोर धरला होता. मात्र आता अर्जुन कपूरने या वृत्तावर मौन सोडले आहे. अर्जुन कपूर म्हणतो की त्याच्या आणि मलायकामध्ये सर्व काही ठीक आहे, या निव्वळ अफवा आहेत.

ब्रेकअपच्या वृत्तादरम्यान अर्जुन कपूरने स्वतःचा आणि मलायका अरोराचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले- 'या अफवांना जागा नाही.... सुरक्षित रहा. मी सर्वांनी बरे व्हावे अशी प्रार्थना करतो. सर्वांना प्रेम' अर्जुन कपूरच्या या पोस्टवर मलायकानेही कमेंट केली आहे. मलायकाने अर्जुनच्या पोस्टवर हार्ट इमोजी बनवली. त्याचवेळी अभिनेत्री तारा सुतारियाने लिहिले की 'हो, तुम्ही लोक.' यासोबतच हार्ट इमोजी शेअर केली आहे.

बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, मलायका अरोरा गेल्या ६ दिवसांपासून घराबाहेर पडली नाही. अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती खूप दुःखी आहे. मलायका अरोराला ब्रेकअपनंतर एकटे राहायचे आहे. त्यामुळे तिने स्वतःला घरात कैद करून घेतले आहे. काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूर बहीण रिया कपूरच्या घरी गेली होती जिथे त्याने सर्वांसोबत डिनर केले. रिया आणि मलायकाचे घर जवळच आहे. असे असूनही अर्जुन कपूर मलायका अरोराच्या घरी भेटायला गेला नाही. मलायका अनेकदा अर्जुन कपूरसोबत फॅमिली डिनरला जाते पण यावेळी तसे झाले नाही.
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा जवळपास ४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघे अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात आणि कधी-कधी ते रेस्टॉरंट आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात.

Web Title: Arjun Kapoor breaks silence on news of breakup with Malaika Arora; Said ...