अरिजीत सिंगकडे आहे मोक्कार पैस, मर्सिडीज बेंझ, आठ कोटींचं आलिशान घर; एका कॉन्सर्टसाठी घेतो ‘इतके’ मानधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 16:09 IST2023-04-25T15:30:00+5:302023-04-25T16:09:01+5:30

अरिजीत सिंगचा मोठा चाहता वर्ग आहे. जो त्याच्या खासगी जीवनात घडणाऱ्या घडामोडी, राहणीमान इत्यादी गोष्टीं जाणून घेण्यासाठी उत्सुकता असतो.

Arijit singh birthday special bollywood singer property net worth income details | अरिजीत सिंगकडे आहे मोक्कार पैस, मर्सिडीज बेंझ, आठ कोटींचं आलिशान घर; एका कॉन्सर्टसाठी घेतो ‘इतके’ मानधन

अरिजीत सिंगकडे आहे मोक्कार पैस, मर्सिडीज बेंझ, आठ कोटींचं आलिशान घर; एका कॉन्सर्टसाठी घेतो ‘इतके’ मानधन

आपल्या लाडक्या कलाकारांबद्दल जाणून घेण्याची प्रत्येक फॅनची इच्छा असते. त्यांचं खासगी जीवन, त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडी, राहणीमान इत्यादी गोष्टींची फॅन्सना उत्सुकता असते. कलाकारांचे बंगले, फार्महाऊस याबाबत फॅन्सच्या मनात कुतूहल असतं. याच यादीत गायक अरजित सिंगचे नाव सामिल झाले आहे.

सुरुवातीपासूनच अरजित सिंहने आपल्या गायकीने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.  दिवसेंदविस यशाच्या पायरी चढत असताना अरजितने मुंबईत त्याची स्वप्नपूर्ती ही केली आहे. अरजित फक्त त्याच्या गाण्यांमुळे जास्त चर्चेत असतो. मुंबईत प्रत्येकालाच आपल्या स्वप्नाचं घर असावे अशी इच्छा असते. जिथे एक घर घेता घेता नाकी नऊ येते. अरिजीतचे मात्र मुंबईत त्याचं आलिशान घर आहे. त्याची किंमत सुमारे आठ कोटी रुपये इतकी आहे. अरिजित गाड्यांचा शौकीन आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. अरिजितकडे मर्सिडीज बेंझ, रेंज रोव्हर या गाड्या आहेत.

अरिजीत सिंहच्या करियरला केवळ 14-15 वर्षं झाली असली तरी त्याची हिट गाण्यांची यादी खूप मोठी आहे. 2005 मध्ये त्याने त्याच्या करियरला सुरुवात केली. खूपच कमी वेळात त्याने बॉलिवूडमध्ये आपली एक जागा निर्माण केली आहे. अरिजितच्या कॉन्सर्टलाही हजारो चाहते उपस्थित असतात. अरिजित सिंहला लाइव्ह ऐकण्यासाठी चाहते गर्दी करतात. अरिजित सिंह कॉन्सर्टमध्ये एक गाणं गाण्यासाठी आठ ते दहा लाख रुपये घेतो. तर एका कॉन्सर्टसाठी अरिजित एक ते दीड कोटी रुपये आकारतो.

Web Title: Arijit singh birthday special bollywood singer property net worth income details