कायली जेनरने बायॅफ्रेन्डशी केले गुपचूप लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 15:39 IST2018-11-28T15:38:23+5:302018-11-28T15:39:20+5:30

हॉलिवूडची लोकप्रीय टीव्ही पर्सनॅलिटी आणि हॉट मॉडेल कायली जेनर आणि तिचा बॉयफ्रेन्ड ट्रेविस स्कॉट हे दोघेही आपली  ९ महिन्यांची मुलगी स्टॉर्मीसोबत आनंदी आहेत. यादरम्यान एक ताजी बातमी म्हणजे, कायली जेनरने बॉयफे्रन्ड ट्रेविस स्कॉटसोबत लग्न केल्याचे मानले जात आहे.

Are Kylie Jenner And Travis Scott Married? All The Hints They’ve Secretly Wed | कायली जेनरने बायॅफ्रेन्डशी केले गुपचूप लग्न?

कायली जेनरने बायॅफ्रेन्डशी केले गुपचूप लग्न?

हॉलिवूडची लोकप्रीय टीव्ही पर्सनॅलिटी आणि हॉट मॉडेल कायली जेनर आणि तिचा बॉयफ्रेन्ड ट्रेविस स्कॉट हे दोघेही आपली  ९ महिन्यांची मुलगी स्टॉर्मीसोबत आनंदी आहेत. यादरम्यान एक ताजी बातमी म्हणजे, कायली जेनरने बॉयफे्रन्ड ट्रेविस स्कॉटसोबत लग्न केल्याचे मानले जात आहे. होय, कायली आणि ट्रेविस हे दोघे २०१७ पासून सोबत आहेत. गत फेबु्रवारीमध्ये दोघांच्याही मुलीचा जन्म झाला. काल रात्री कायली न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये ट्रेविस स्कॉटच्या कॉन्सर्टला हजेरी लावली. या कॉन्सर्टनंतर कायली व जेनर दोघेही एकत्र दिसले. पहिल्यांदा दोघेही सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले.
विशेष म्हणजे, या कॉन्सर्टपूर्वी कायलीने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये स्कॉटला ‘हबी’ संबोधले. the look ya give when ur hubby is performing at madison square garden tonightअसे तिने लिहिले. तिच्या या पोस्टवरून कायली व स्कॉटने गुपचूप लग्न केल्याचे मानले जात आहे.

इन्स्टाग्रामवर कायलीच्या फॅन फॉलोअर्सची संख्या ९५.८ मिलियन आहे. त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, तिचे हे फोटो किती मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात आहे. कायलीने वयाच्या नवव्या वर्षीच ‘किपिंग अप विथ द कर्दाशियन’ या प्रसिद्ध टीव्ही सिरीजमध्ये अभिनय केला. पुढे तिने अभिनयाबरोबरच मॉडलिंगलाही सुरुवात केली. आज कायली टीव्ही जगतात प्रसिद्ध असून, मॉडलिंग क्षेत्रातही तिने स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे. 

Web Title: Are Kylie Jenner And Travis Scott Married? All The Hints They’ve Secretly Wed