पाहा अर्चना पुरणसिंगचा बंगला, आहे एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षाही प्रशस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 21:00 IST2020-05-03T21:00:00+5:302020-05-03T21:00:02+5:30

अर्चनाच्या बंगल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अर्चनाचा बंगला हा एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलप्रमाणे असल्याचे मत नेटिझन्सने व्यक्त केले आहे.

Archana puran Singh Bungalow video viral on social media PSC | पाहा अर्चना पुरणसिंगचा बंगला, आहे एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षाही प्रशस्त

पाहा अर्चना पुरणसिंगचा बंगला, आहे एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षाही प्रशस्त

ठळक मुद्देअर्चनाच्या बंगल्याला प्रशस्त गार्डन असून बंगल्याच्या आवारात मिरची, वांगी, पपई, शेवगाच्या शेंगा, कैरी, टॉमेटो अशी झाडं देखील आहेत. 

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. सामान्य लोकांसोबत सेलिब्रेटीदेखील आपापल्या घरात असून सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत. सगळेच सेलिब्रेटी सोशल मीडियावर सक्रिय असून आपले फोटो, व्हिडिओ पोस्ट करत आहेत. काही सेलिब्रेटी तर मजेदार व्हिडिओ पोस्ट करत त्यांच्या फॅन्सचे मनोरंजन करत आहेत. 

द कपिल शर्मा शो मध्ये आपल्याला गेल्या काही महिन्यांपासून अर्चना पुरण सिंगला पाहायला मिळत आहे. अर्चनाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अर्चनाने काही दिवसांपूर्वी तिच्या घरात काम करणाऱ्या मुलीचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. अर्चनाने घरात काम करणाऱ्या मुलीला फेमस केल्याबद्दल तिचे चांगलेच कौतुक झाले होते आणि आता सोशल मीडियावर अर्चनाच्या बंगल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अर्चनाचा बंगला हा अतिशय प्रशस्त असून त्याचे गार्डनदेखील अतिशय मोठे आहे. अर्चनानेच तिच्या बंगल्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

अर्चनाच्या बंगल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अर्चनाचा बंगला हा एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलप्रमाणे असल्याचे मत नेटिझन्सने व्यक्त केले आहे. एवढेच नव्हे तर तिचा बंगला हा एखाद्या ए स्टार अभिनेत्याप्रमाणे असल्याचे सोशल मीडियाद्वारे तिचे चाहते सांगत आहेत. तिच्या बंगल्याला प्रशस्त गार्डन असून बंगल्याच्या आवारात मिरची, वांगी, पपई, शेवगाच्या शेंगा, कैरी, टॉमेटो अशी झाडं देखील आहेत. 

Web Title: Archana puran Singh Bungalow video viral on social media PSC