​अरबाज-मलायका मे महिन्यात घेणार घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 17:39 IST2016-12-01T17:39:09+5:302016-12-01T17:39:09+5:30

अभिनेता अरबाज खान व अभिनेत्री मलायका अरोरा यांच्यात घटस्फोट होणार हे निश्चित झाले आहे. फॅ मिली कोर्टाच्या नियमानुसार घटस्फोटाच्या ...

Arbaaz-Maya May take place in May | ​अरबाज-मलायका मे महिन्यात घेणार घटस्फोट

​अरबाज-मलायका मे महिन्यात घेणार घटस्फोट

ong>अभिनेता अरबाज खान व अभिनेत्री मलायका अरोरा यांच्यात घटस्फोट होणार हे निश्चित झाले आहे. फॅ मिली कोर्टाच्या नियमानुसार घटस्फोटाच्या समुपदेशनानंतर सहा महिन्यांचा ‘कुलिंग आॅफ पिरियेड’ दिला जातो. अरबाज व मलायकाचा हा क लावधी सुरू झाला असून, तो समाप्त झाल्यावर दोघेही मे महिन्यात घटस्फोट घेऊ शकतात. 

अरबाज खान आणि मलायका अरोरा यांना बॉलिवूडमधील हॉट कपल मानले जाते. मागील काही काळापासून दोघेही एकमेकांपासून दुरावले असून त्यांचे नाते घटस्फोटापर्यंत पोहोचले आहे. दोघांनी घटस्फोटासाठी रितसर अर्ज केला व समुपदेशनाला उपस्थिती लावली. कोर्टाच्या नियमानुसार घटस्फोटाचा अर्ज दिल्यावर पती-पत्नीचे समुपदेशन केले जाते. यानंतर दोघांना या निर्णयावर विचार करण्यासाठी ‘कुलिंग आॅफ पिरियेड’ दिला जातो. या दरम्यान त्यांचा विचार बदलला व दोघांनी एकत्र राहण्यास संमती दर्शविली तर घटस्फोटाचा अर्ज रद्द होऊ शकतो. 

‘कुलिंग आॅफ पिरियेड’मध्ये पती पत्नीच्या समुपदेशनाचे अनेक सेशन होतात. अरबाज व मलायका यांनी मुंबईच्या बांद्रा येथील फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. अर्जानंतर  मंगळवारी अरबाज व मलायकाने समुपदेशनासाठी हजेरी लावली होती. समुपदेशनाचे पहिले सेशन संपले असून दोघांनी मॅरेज काऊंसलरने विचारलेल्या प्रश्नांची समजूतदारपणे उत्तरे दिली असल्याची माहिती मिळाली आहे. 

मलायका व अरबाज यांच्यात घटस्फोटाच्या बातम्या मागील कित्येक महिन्यापासून येत आहेत. दोघांनी एकमेकांना विचार करण्यासाठी बराच वेळ दिला होता. आता कोर्टाने पुन्हा एकदा त्यांना विचार करण्याचा वेळ दिला आहे. कोर्टाने घटस्फोटासाठी ११ मे २०१७ ही तारीख दिली आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यास एकाच दिवसांत त्यांना अर्ज मिळू शकतो. मात्र, यापूर्वी त्यांना आपला अर्ज मागे घेता येणार आहे हे विशेष. 

Web Title: Arbaaz-Maya May take place in May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.