"ताकते रहते तुझको...", दुसऱ्या पत्नीसाठी अरबाजने गायलं गाणं, लग्नसोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 12:35 PM2023-12-29T12:35:00+5:302023-12-29T12:36:30+5:30

अरबाजने शूरासाठी सगळ्यांसमोर 'तेरे मस्त मस्त दो नैन' हे गाणं गात आपलं प्रेम व्यक्त केलं.

arbaaz khan sing a song tere mast mast do nain for second wife shora khan video goes viral | "ताकते रहते तुझको...", दुसऱ्या पत्नीसाठी अरबाजने गायलं गाणं, लग्नसोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल

"ताकते रहते तुझको...", दुसऱ्या पत्नीसाठी अरबाजने गायलं गाणं, लग्नसोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अरबाजने ५६व्या वर्षी दुसरं लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. अरबाजने मेकअप आर्टिस्ट शूरा खान हिच्याशी निकाह केला. त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो व्हायरल झाले होते. आता अरबाज आणि शूराच्या लग्नातील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. 

अरबाजच्या लग्नात त्याचा लेक आणि सलमाननेही डान्स केला. तर दुसऱ्या पत्नीसाठी अरबाजने लग्नसोहळ्यात खास गाणंही गायलं. अरबाजने शूरासाठी सगळ्यांसमोर 'तेरे मस्त मस्त दो नैन' हे गाणं गात आपलं प्रेम व्यक्त केलं. अरबाजने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला त्याने "म्हणून माझ्या वडिलांना मी गायक नव्हे तर क्रिकेटर व्हावसं वाटत होतं," असं कॅप्शन दिलं आहे. अरबाजच्या या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. 

अरबाज-शुराने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे अत्यंच गोपनीय पद्धतीने हा निकाह सोहळा अर्पिता खानच्या घरी पार पडला. या सोहळ्याला रितेश देशमुख,जिनिलीया देशमुख, बाबा सिद्दीकी, सलमा खान, हर्षदीप कौर आणि युलिया वंतूर या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 

१९९८ मध्ये अरबाजने मलायकाशी विवाह केला होता. जवळपास १९ वर्षांच्या संसारानंतर २०१७ मध्ये घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. या दोघांना अरहान हा मुलगा असून घटस्फोटानंतरही ही जोडी त्याचा व्यवस्थित सांभाळ करत आहेत. मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज मॉडेल जॉर्जिया एंड्रियाला डेट करत होता. त्यानंतर त्याने काहीच दिवसांपूर्वी शूराशी निकाह करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. 

Web Title: arbaaz khan sing a song tere mast mast do nain for second wife shora khan video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.