गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 15:25 IST2025-10-05T15:24:58+5:302025-10-05T15:25:52+5:30

बॉलिवूडमधून एक गुडन्यूज येत आहे. खान कुटुंबीयांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. अरबाज खानची पत्नी शूराने गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

arbaaz khan becomes father again wife shura khan blessed with baby girl | गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म

गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म

बॉलिवूडमधून एक गुडन्यूज येत आहे. खान कुटुंबीयांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. अरबाज खानची पत्नी शूराने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. शूरा आणि अरबाज आईबाबा झाले आहेत. शनिवारी(४ ऑक्टोबर) शूराला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज शूराची डिलिव्हरी झाली. शूरा आणि अरबाजला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. शूराला कन्यारत्न झाल्याने खान कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 

काही महिन्यांपूर्वीच अरबाज आणि शूराने आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली होती. तर नुकतंच शूराचं बेबी शॉवरही पार पडलं होतं. आता त्यांना कन्यारत्न झालं आहे. त्यामुळे चाहतेही आनंदी आहेत. शूराने अरबाज आणि तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. तर अरबाज ५९व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. 


अरबाजने शूरासोबत २०२३ मध्ये निकाह केला होता. त्या दोघांमध्ये २२ वर्षाचं अंतर आहे. अरबाज खान ५८ वर्षांचा आहे तर शूरा ३५ वर्षांची आहे. अरबाजचं हे दुसरं लग्न आहे. त्याने मलायकासोबत १९९८ मध्ये संसार थाटला होता. पण २०१७मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्याला २२ वर्षांचा अरहान हा मुलगादेखील आहे. 

Web Title : अरबाज खान 58 साल की उम्र में फिर बने पिता, पत्नी शूरा ने बेटी को जन्म दिया।

Web Summary : अरबाज खान और शूरा खान को एक बेटी का आशीर्वाद मिला है। शूरा को शनिवार को अस्पताल में भर्ती कराया गया और आज उसने बच्चे को जन्म दिया। 58 वर्षीय अरबाज दूसरी बार पिता बने। उन्होंने 2023 में शूरा से शादी की, उनकी पहली शादी मलाइका अरोड़ा से हुई थी।

Web Title : Arbaaz Khan becomes father again at 58; wife Shura gives birth.

Web Summary : Arbaaz Khan and Shura Khan are blessed with a baby girl. Shura was admitted to the hospital on Saturday and delivered today. Arbaaz, 58, becomes a father for the second time. He married Shura in 2023, his first marriage was with Malaika Arora.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.