अरबाज खानच्या लेकीचं बारसं! नावही ठेवलंय फारच खास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 17:54 IST2025-10-08T17:51:54+5:302025-10-08T17:54:05+5:30
लक्ष्मीच्या पावलांनी अरबाजच्या लेकीने खान कुटुंबात प्रवेश केला आहे. खान कुटुंबीयांनी लाडक्या लेकीचं बारसं करत नावही ठेवलं आहे.

अरबाज खानच्या लेकीचं बारसं! नावही ठेवलंय फारच खास
काही दिवसांपूर्वीच खान कुटुंबीयांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. अरबाज खानची दुसरी पत्नी शूराने रविवारी(५ ऑक्टोबर) त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. त्यांना कन्यारत्न झालं आहे. लक्ष्मीच्या पावलांनी अरबाजच्या लेकीने खान कुटुंबात प्रवेश केला आहे. खान कुटुंबीयांनी लाडक्या लेकीचं बारसं करत नावही ठेवलं आहे.
अरबाज आणि शूराने लेकीचं नाव चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. त्यांनी आपल्या मुलीचं नाव 'सिपारा' Sipaara असं ठेवलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना ही माहिती दिली आहे. "वेलकम बेबी गर्ल सिपारा खान" असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. चाहते आणि सेलिब्रिटींनी या पोस्टवर कमेंट करत अरबाज-शूराचं अभिनंदन केलं आहे.
अरबाजने शूरासोबत २०२३ मध्ये निकाह केला होता. त्या दोघांमध्ये २२ वर्षाचं अंतर आहे. अरबाज खान ५८ वर्षांचा आहे तर शूरा ३५ वर्षांची आहे. अरबाजचं हे दुसरं लग्न आहे. त्याने मलायकासोबत १९९८ मध्ये संसार थाटला होता. पण २०१७मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्याला २२ वर्षांचा अरहान हा मुलगादेखील आहे.