"पत्नी नाही मुलगीच वाटते" अरबाजने शूराला दिलं फ्लाईंग किस, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 10:35 AM2024-01-06T10:35:26+5:302024-01-06T10:36:24+5:30

अरबाजचा पत्नीसोबतचा व्हिडिओ व्हायरल

arbaaz khan and shhura khan newly wed couple gets trolled on internet netizens says she is looking like his daughter | "पत्नी नाही मुलगीच वाटते" अरबाजने शूराला दिलं फ्लाईंग किस, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

"पत्नी नाही मुलगीच वाटते" अरबाजने शूराला दिलं फ्लाईंग किस, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

अभिनेता अरबाज खानने (Arbaaz Khan) काही दिवसांपूर्वीच मेकअप आर्टिस्ट शूरा खानसह (Shhura Khan)  लग्न केलं. दोघंही हनिमून आणि न्यू इयर साजरा करुन मुंबईत परत आले आहेत. त्यांचा विमानतळावरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शूरा खान सुरुवातीपासूनच पापाराझींकडे दुर्लक्ष करत आली आहे. यामध्येही तिने कॅमेऱ्याकडे न पाहता खाली पाहूनच चालत आहे. या व्हिडिओवरुन नेटकऱ्यांनी अरबाजची मुलगी वाटते असं म्हणत कपलला ट्रोल केलं आहे.

56 वर्षीय दिग्दर्शक, अभिनेता अरबाज खानने मलायका अरोराला घटस्फोट दिल्यानंतर तो काही काळ मॉडेल जॉर्जियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र जॉर्जियासोबत त्याचा ब्रेकअप झाला आणि ब्रेकअपनंतर काहीच दिवसात तो शूरा खानसोबत लग्नबंधनात अडकला. बहीण अर्पिता खानच्या घरीच त्यांचा निकाह झाला. यानंतर दोघंही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि हनिमूनसाठी सुट्टीवर गेले. नुकतेच दोघंही मुंबईत परत आले आहेत.  यामध्ये अरबाज व्हाईट शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये हँडसम दिसतोय. तर शूरा ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसली. दोघंही हातात हात पकडून विमानतळावर आले.

शूरा खानने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अरबाजचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो पाठीला गिटारची बॅग लावून समोर चालताना दिसतोय. शूरा त्याला आवाज देते तेव्हा तो मागे वळून बघतो आणि तिला फ्लाईंग किस देतो. हा व्हिडिओही चांगलाच व्हायरल होतोय.

हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी ट्रोलिंगची संधी सोडली नाही. 'ही तर अरबाजची मुलगी किंवा बहिणीच वाटते, पत्नी तर कोणत्याच अँगलने वाटत नाही.' अशी कमेंट एकाने केली. तर दुसऱ्या ट्रोलरने त्यांचं लग्न किती काळ टिकेल यावरच शंका उपस्थित केली. 

अरबाज आणि शूरा खानची भेट एका सिनेमाच्या सेटवर झाली होती. त्यांच्यात कधी प्रेम फुललं हे कोणालाच कळलं नाही. जॉर्जिया नंतर अरबाजने शूराशी लग्न करत चाहत्यांना सरप्राईजच दिलं आहे. 

Web Title: arbaaz khan and shhura khan newly wed couple gets trolled on internet netizens says she is looking like his daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.