जॉर्जिया अँड्रियानीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अरबाज खानच्या आयुष्यात नव्या लव्ह लेडीची एंट्री, नाव वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 13:42 IST2023-12-21T13:41:35+5:302023-12-21T13:42:51+5:30

जॉर्जियाशी ब्रेकअप झाल्यानंतर अरबाजच्या आयुष्यात पुन्हा नवं प्रेम आल्याचं बोललं जातंय.

Arbaaz khan after breakup giorgia andriani finds love again to get married soon dating shura khan | जॉर्जिया अँड्रियानीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अरबाज खानच्या आयुष्यात नव्या लव्ह लेडीची एंट्री, नाव वाचून व्हाल हैराण

जॉर्जिया अँड्रियानीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अरबाज खानच्या आयुष्यात नव्या लव्ह लेडीची एंट्री, नाव वाचून व्हाल हैराण

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाज खान त्याच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानी(Georgia Andriani) अरबाजसोबत ब्रेकअप झाल्याचा खुलासा केला होता. जॉर्जियाशी ब्रेकअप झाल्यानंतर अरबाजच्या आयुष्यात पुन्हा नवं प्रेम आल्याचं बोललं जातंय. 

मलायकासोबत घटस्फोट झाल्यानंतर अरबाजच्या आयुष्यात जॉर्जियाची एंट्री झाली होती. जॉर्जिया एंड्रियानी आणि अरबाज खान यांचे प्रेमप्रकरण खूप गाजलं होतं.  याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या दोघांमधील वयाचे अंतर. . दोघांच्या वयात २२ वर्षांचा फरक होता, जिथे अरबाज ५६ वर्षांचा आहे, तर जॉर्जिया फक्त ३४ वर्षांची आहे. जॉर्जिया आणि अरबाज खान गेल्या ४ वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये  होते. अलिकडेच एका मुलाखती दरम्यान जॉर्जियाने अरबाजसोबत झालेल्या ब्रेकअपवर मोकळेपणे भाष्य केलं आहे होते. अशातच आता अरबाज खान पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचा चर्चा सुरु झाल्या आहेत.    

कोण आहे अरबाजची गर्लफ्रेंड?
मीडिया रिपोर्टनुसार अरबाज खान बॉलिवूड मेकअप आर्टिस्ट शूरा खानला डेट करतोय. दोघेही या नात्याला घेऊन सिरिअस आहे तसेच लवकरच लग्न करण्याचा प्लानही आहे. अरबाज आणि शूराची पहिली ओळख त्याचा आगामी सिनेमा 'पटना शुक्ला'च्या सेटवर झाली होती. हा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. शूरा बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानी यांची मेकअप आर्टिस्ट आहे. 

Web Title: Arbaaz khan after breakup giorgia andriani finds love again to get married soon dating shura khan