‘मुबारकाँ’ मुळे अथिया नर्व्हस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2016 17:31 IST2016-11-27T17:31:07+5:302016-11-27T17:31:07+5:30

‘हिरो’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री अथिया शेट्टी तिच्या आगामी ‘मुबारकाँ’ चित्रपटासाठी खुप उत्सुक आहे. पण, ती म्हणते,‘ प्रथमच ...

'Apocalypse' due to Athiya Nervus! | ‘मुबारकाँ’ मुळे अथिया नर्व्हस!

‘मुबारकाँ’ मुळे अथिया नर्व्हस!

िरो’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री अथिया शेट्टी तिच्या आगामी ‘मुबारकाँ’ चित्रपटासाठी खुप उत्सुक आहे. पण, ती म्हणते,‘ प्रथमच मी कॉमेडी चित्रपटात काम करत असून खुपच नर्व्हस आहे. ‘मुबारकाँ’ मध्ये अनिल कपूर आणि अर्जुन कपूर हे दिग्गज कलाकार असून माझी भूमिका प्रेक्षकांना आवडेल की नाही याबद्दल मला शंका वाटते आहे. ’ अर्जुन या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार असून चित्रपटाचा फर्स्ट लुकही ट्रेडिशनल लग्नाची पत्रिकेच्या स्वरूपात लाँच झाला आहे. 

चित्रपटात इलियाना डिक्रुझ ही अथिया शेट्टीसोबत सहकलाकाराच्या भूमिकेत दिसेल. या दोघी अभिनेत्री प्रथमच एकमेकांसोबत काम करतील. अथिया तर कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी आतुर झाली आहे. अथियाने तिची चित्रपटाबद्दलची उत्सुकता स्पष्ट करण्यासाठी टिवटरवर शेअर केले आहे की, ‘ चित्रपटाचे फर्स्ट शेड्यूल पूर्ण झाले असून आता मी गँग जॉईन करायला खुपच उत्सुक आहे. मी कॅमेºयासमोर केव्हा जाणार या विचारानेच मला फार आनंदी वाटतेय. ’ 

Web Title: 'Apocalypse' due to Athiya Nervus!