​कुठल्याही क्षणी कपूर कुटुंबियांना सोपवले जाऊ शकते श्रीदेवी यांचे पार्थिव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 15:35 IST2018-02-27T09:39:08+5:302018-02-27T15:35:20+5:30

श्रीदेवी यांचे पार्थिव कोणत्याही क्षणी त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात येऊ शकते. इंडिया इन दुबई या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या ट्वीटद्वारे ...

At any given moment, the family can be handed over to the family of Sridevi | ​कुठल्याही क्षणी कपूर कुटुंबियांना सोपवले जाऊ शकते श्रीदेवी यांचे पार्थिव

​कुठल्याही क्षणी कपूर कुटुंबियांना सोपवले जाऊ शकते श्रीदेवी यांचे पार्थिव

रीदेवी यांचे पार्थिव कोणत्याही क्षणी त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात येऊ शकते. इंडिया इन दुबई या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या ट्वीटद्वारे सांगण्यात आले आहे की, मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे दुबई पोलिसांनी दिलेली आहेत. त्यामुळे पार्थिव कुटुंबियांना सोपवण्याची औपचारिकता लवकरच पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे आज रात्रीपर्यंत श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत घेऊन देण्यात येईल असे सूत्रांकडून समजतेय. श्रीदेवी यांचे पार्थिव अनिल अंबानी यांच्या चार्टड विमानाने मुंबईत आणले जाणार आहे. त्यांच्या अंतिम संस्काराची तयारी सध्या मुंबईत सुरू आहे. उद्या सकाळी ८ ते १० या दरम्यान अंतिम दर्शनासाठी पार्थिव वर्सोवा येथील श्रीदेवीच्या बंगल्यात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम यात्रेला सुरुवात होईल.
श्रीदेवी यांचा हृद्यविकाराने मृत्यू झाला असल्याची चर्चा शनिवारपासून होती. पण आता त्यांच्या मृत्यूप्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. त्यांचा मृत्यू पाण्यात बुडाल्यामुळे झाला असल्याचे फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झाले आहे. आता श्रीदेवी यांच्या फोन रेकॉर्डची तपासणी केली जाणार आहे. तसेच श्रीदेवी यांचे जुने मेडिकल रिपोर्ट देखील भारतातून मागवण्यात आले आहेत. श्रीदेवी यांच्यावर कोणते उपचार सुरू होते का याविषयी देखील ते जाणून घेणार आहेत. तसेच त्यांनी केलेल्या सर्जरीचे देखील रिपोर्ट मागण्यात आले आहेत. या सगळ्याचा त्यांच्या मृत्यूशी काही संबंध आहे का याची तपासणी देखील पोलिस करणार आहेत. 
श्रीदेवी यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. 
श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. बालकलाकार म्हणून श्रीदेवी यांनी चित्रपटसृष्टीत पाय ठेवला होता. त्यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तमिळ चित्रपटात काम केले. १९६७ साली एका मल्याळम चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना केरळ सरकारने सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवले होते.
श्रीदेवी यांनी १९७८ ला सोलावा सावन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहे. बॉलिवूडमधील सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गवाह, जुदाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. 

Also Read : कपूर कुटुंबियांना दुबईतून बाहेर जाण्यास करण्यात आली मनाई

Web Title: At any given moment, the family can be handed over to the family of Sridevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.