अनुष्का शेट्टीचे वजन होईना कमी! प्रभासच्या ‘साहो’मधून झाली ‘छुट्टी’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2017 10:37 IST2017-07-10T05:06:32+5:302017-07-10T10:37:05+5:30
‘बाहुबली’ जोडी अर्थात प्रभास व अनुष्का शेट्टी यांना ‘साहो’मध्ये एकत्र पाहण्यास तुम्ही आम्ही उत्सूक आहोत. पण आता तुमच्या आमच्या ...

अनुष्का शेट्टीचे वजन होईना कमी! प्रभासच्या ‘साहो’मधून झाली ‘छुट्टी’!!
‘ ाहुबली’ जोडी अर्थात प्रभास व अनुष्का शेट्टी यांना ‘साहो’मध्ये एकत्र पाहण्यास तुम्ही आम्ही उत्सूक आहोत. पण आता तुमच्या आमच्या या आनंदावर पाणी फेरणारी एक बातमी आहे. ‘बाहुबली2’च्या अपार यशानंतर प्रभास व अनुष्का यांचा आॅनस्क्रीन रोमॉन्स पुन्हा एकदा पाहायला मिळणार, यामुळे चाहते आनंदले होते. ‘बाहुबली2’मध्ये देवसेनाच्या रूपात अनुष्का एकदम देसी अवतारात दिसली होती. पण ‘साहो’मध्ये अनुष्का एकदम मॉडर्नमध्ये लूकमध्ये दिसणार, अशी खबर होती. अनुष्काचा ‘देवसेना’चा देसी लूक विसरायला प्रेक्षकांना भाग पाडायचे, असा मेकर्सचा इरादा होता. ‘साहो’मधील भूमिकेसाठी अनुष्का बरीच मेहनत घेतेय, असेही ऐकिवात आले होते. पण आता एक वेगळीच बातमी आहे. ती सुद्धा ‘बाहुबली’ जोडीचा आॅनस्क्रीन रोमान्स पाहण्यासाठी आसुसलेल्या चाहत्यांची निराशा करणारी. होय, ‘साहो’मधून अनुष्का शेट्टी आऊट झाल्याची.
‘साहो’ युनिटमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटासाठी अनुष्का बरीच मेहनत घेत होती. पण अनुष्काचे वजन आडवे आले आणि सगळेच बिनसले. जिममध्ये गेल्या दोन महिन्यांपासून घाम गाळूनही अनुष्काचे वजन फार कमी झालेले नाही. ‘साहो’साठी अनुष्का साईज झिरोमध्ये दिसणार होती. मात्र अद्यापही अनुष्काचे वजन पाच ते आठ किलो अधिक आहे. यामुळेच ‘साहो’साठी एकप्रकारे अनुष्का ‘अनफिट’ ठरली आहे. या ‘बाहुबली2’साठी अनुष्काने वजन वाढवले होते. ‘बाहुबली2’चे दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांचा तसा आग्रह होता. पण आता हे वाढलेले वजनच कमी करणे अनुष्कासाठी कठीण होऊन बसले आहे. या वजनामुळे ‘साहो’मधून बाद होण्याची वेळ तिच्यावर आल्याचे कळतेय. आता यातून काही तोडगा निघतो का, ते आपण बघूच!!
ALSO READ : ‘साहो’मध्ये दिसणार अनुष्का शेट्टीचा ग्लॅम अल्ट्रा लूक!!