अनुष्का शेट्टी आणि आर. माधवन 'निशब्दम'साठी आले एकत्र, चाहते उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 12:19 IST2020-09-19T12:18:54+5:302020-09-19T12:19:31+5:30

बाहुबली फेम अनुष्का शेट्टी आणि बॉलिवूड अभिनेता आर.माधवन 'निशब्दम'मध्ये काम करताना दिसणार आहेत.

Anushka Shetty and R. Madhavan came together for 'Nishabdam', fans eager | अनुष्का शेट्टी आणि आर. माधवन 'निशब्दम'साठी आले एकत्र, चाहते उत्सुक

अनुष्का शेट्टी आणि आर. माधवन 'निशब्दम'साठी आले एकत्र, चाहते उत्सुक

बाहुबली फेम अनुष्का शेट्टी आणि बॉलिवूड अभिनेता आर.माधवन 'निशब्दम'मध्ये काम करताना दिसणार आहेत. अमेझॉन प्राईम व्हिडीओवर येत्या 2 ऑक्टोबरला याचा जागतिक प्रिमिअर होणार आहे. हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. अनुष्का व आर. माधवनचे चाहते या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 


'निशब्दम' या चित्रपटात अनुष्का शेट्टी, आर माधवन आणि अंजलि यांच्या प्रमुख भूमिका असून त्यांच्यासोबत शालिनी पांडे, सुब्बाराजू आणि श्रीनिवास अवासराला, माइकल मैडसेन देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत.

दिग्दर्शक हेमंत मधुकर यांच्याद्वारे दिग्दर्शित आणि कोना फिल्म कॉर्पोरेशनसोबत पीजी मीडिया फैक्ट्रीचे टीजी विश्व प्रसाद यांच्याद्वारे निर्मित हा चित्रपट एक सस्पेंस थ्रिलर असून त्याचे कथानक एक मुकबधिर कलाकार, तिचा सेलिब्रिटी-संगीतकार पति आणि तिची खास मैत्रीण यांच्या अचानक गायब होण्याच्या आसपास फिरतो. हा चित्रपट तेलुगु, तमिळ आणि मल्याळम भाषेत असणार आहे.


अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिने सांगितले, “साक्षी मी आत्तापर्यंत साकारलेल्या व्यक्तिरेखांहुन भिन्न आहे. एक अशी व्यक्तिरेखा, जिने मला माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढले, एक अशी व्यक्तिरेखा निभावून मी आनंदित आहे. माधवन सोबत काम करणे खरोखर आनंददायी होते, मी नेहमीच त्यांची चाहती राहिली आहे."

“मला थ्रिलर चित्रपट पाहायला आणि त्याचा भाग व्हायला आवडते.  निशब्दम निश्चितपणे सर्वात दिलचस्प चित्रपटांपैकी एक आहे, त्यासोबत मी जोडला गेलो आहे, अभिनेता आर. माधवनने सांगितले.  या चित्रपटातून अनुष्का शेट्टी आपले डिजिटल पदार्पण करत असून माइकल मैडसेन (वन्स अपॉन ए टाइम इन हॉलीवुड, किल बिल, रिज़र्वेर डॉग) भारतीय सिनेमा सृष्टीत पदार्पण करत आहे. 
 

Web Title: Anushka Shetty and R. Madhavan came together for 'Nishabdam', fans eager