​अनुष्का शर्माच्या या लाडक्या मैत्रिणीने केले बॉलिवूड अभिनेत्यासोबत लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 13:18 IST2018-05-11T07:47:23+5:302018-05-11T13:18:57+5:30

अनुष्का शर्माची मैत्रीण अमेयरा पुनवानीने नुकतेच लग्न झाले. अमेयरा ही प्रसिद्ध कॉस्ट्यूम डिझायनर असून फॅशन वर्ल्ड मध्ये ती चांगलीच ...

Anushka Sharma's romantic friend has married a Bollywood actor | ​अनुष्का शर्माच्या या लाडक्या मैत्रिणीने केले बॉलिवूड अभिनेत्यासोबत लग्न

​अनुष्का शर्माच्या या लाडक्या मैत्रिणीने केले बॉलिवूड अभिनेत्यासोबत लग्न

ुष्का शर्माची मैत्रीण अमेयरा पुनवानीने नुकतेच लग्न झाले. अमेयरा ही प्रसिद्ध कॉस्ट्यूम डिझायनर असून फॅशन वर्ल्ड मध्ये ती चांगलीच प्रसिद्ध आहे. तिने तिचा प्रियकर शिव पंडित सोबत लग्न केले. शिव हा अभिनेता असून त्याने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. शिव पंडितने शैतान या चित्रपटापासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांनी चांगलीच आवडली होती. एवढेच नव्हे तर या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्याचे नामांकन देखील मिळाले होते. तसेच लीलाई या त्याच्या तमीळ या चित्रपटातील भूमिकेला देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. चित्रपटांमध्ये मिळालेल्या प्रगतीनंतर शिव मालिकांकडे वळला. एफआरआय या मालिकेत त्याने साकारलेल्या इन्सपेक्टरची भूमिका चांगलीच गाजली होती. ही मालिका संपून कित्येक वर्षं झाले असले तरी या मालिकेतील त्याची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. तसेच झलक दिखला जा या कार्यक्रमाच्या एका सिझनचे देखील त्याने सूत्रसंचालन केले होते. 
अमेयरा आणि शिव हे गेल्या कित्येक वर्षांपासून नात्यात आहेत. त्यांनी ९ मे ला मुंबईत लग्न केले. त्यांच्या लग्नाला केवळ इंडस्ट्रीतील त्याचे जवळचे मित्रमैत्रीण आणि कुटुंबातील मंडळीच हजर होते. शिवचे लग्न झाले असल्याची बातमी प्रसिद्ध दिग्दर्शक झोय अख्तरने सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना दिली. तिने शिव आणि अमेयराला शुभेच्छा देत त्यांच्या लग्नाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत शिव आणि त्याची पत्नी अमेयरा हे दोघेही खूपच छान दिसत आहेत. 
अमेयरा ही गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माची तर ती खूपच जवळची मैत्रीण मानली जाते. अनुष्का आणि विराट कोहलीच्या लग्नाला ठरावीक लोकांनीच हजेरी लावली होती. या लोकांमध्ये अमेयराचा समावेश होता. ती लग्नाच्या आधीपासूनच अनुष्कासोबत इटलीमध्ये होती. तसेच अनुष्काच्या मुंबईतील रिसेप्शनचे देखील तिला खास आमंत्रण होते. अमेयराने नुकतेच रेड या चित्रपटातील इलियाना डिक्रूजचे ड्रेस डिझाइन केले होते. 

shiv pandit wife

Also Read : ​'इट्स नॉट दॅट' सिंपलच्या सक्सेसनंतर 'अनटॅग' वेब सिरिज रसिकांच्या भेटीला

Web Title: Anushka Sharma's romantic friend has married a Bollywood actor