आजोबांच्या कुशीत चिमुकली वामिका; अनुष्का शर्माने बाबाच्या वाढदिवशी शेअर केलेत अनसीन फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 12:35 IST2021-03-26T12:33:42+5:302021-03-26T12:35:20+5:30

अनुष्का शर्माची एक पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतेय. वडिलांच्या 60 व्या वाढदिवसाला अनुष्काने एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे, सोबत जुने फोटो आणि असंख्य स्मृती.

anushka sharma wish fathers on his birthday share adorable photo with vamika | आजोबांच्या कुशीत चिमुकली वामिका; अनुष्का शर्माने बाबाच्या वाढदिवशी शेअर केलेत अनसीन फोटो

आजोबांच्या कुशीत चिमुकली वामिका; अनुष्का शर्माने बाबाच्या वाढदिवशी शेअर केलेत अनसीन फोटो

ठळक मुद्देसध्या अनुष्का व वामिका विराटसोबत पुण्यात आहे. विराट पुण्यात वन-डे मालिकेत बिझी आहे.

मुलीच्या जन्मानंतर मातृत्वाचा आनंद घेणारी अभिनेत्री अनुष्का शर्माची एक पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतेय. वडिलांच्या 60 व्या वाढदिवसाला अनुष्काने एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे, सोबत जुने फोटो आणि असंख्य स्मृती. या फोटोंपैकी एका फोटो अगदीच खास आहे. कारण यात वामिका आणि तिचे आजोबा दिसत आहेत. अनुष्काचे पापा नातीचे लाडकौतुक करत आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

पापाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अनुष्का लिहिते, ‘माझ्या 1961 स्पेशल एडिशनचा 60 वा वाढदिवस आहे. त्यांनी मला सच्चेपणा शिकवला. योग्य दिशेने प्रवास करण्यासाठी मला प्रोत्साहित केले. मनाची शांती खूप गरजेची आहे, असे ते नेहमी म्हणतात. त्यांनी अनेक बाबतील मला प्रेरित केले. मी तुमच्यावर खूप प्रेम करते बाबा.....’

या पोस्टसोबत अनुष्काने वडिलांचे तरूणपणापासून आत्तापर्यंतचे अनेक फोटो शेअर केले आहे. शेवटच्या फोटोत तिच्या बाबांच्या कुशीत चिमुकली वामिका दिसत आहे. अर्थात या फोटोतही वामिकाचा चेहरा दिसत नाही.

काही महिन्यांपूर्वीच अनुष्का आई झाली. अनुष्का व विराटने मुलीचे वामिका असे नामकरण केले आहे. वामिकाचा चेहरा अद्यापही जगाला दिसलेला नाही. जाणीवपूर्वक वामिकाला मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय विरूष्काने घेतला आहे.

सध्या अनुष्का व वामिका विराटसोबत पुण्यात आहे. विराट पुण्यात वन-डे मालिकेत बिझी आहे. त्याच्यासोबत अनुष्का व वामिकाही गेल्या आहेत. अलीकडे विरूष्काचे वामिकासोबतचे विमानतळावरचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते.

 विराट आणि अनुष्का यांची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यावेळी दोघे जाहिरातीचे शूटिंग करत होते. त्यापूर्वी विराटने कोणत्या अभिनेत्रीसोबत काम केले नव्हते. त्यामुळे तो सेटवर अनुष्का शर्मासमोर खूप नर्व्हस झाला होता.
या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान विराट आणि अनुष्कामध्ये फ्रेंडशीप झाली आणि मग ते दोघे एकमेकांना भेटू लागले. काही कालावधीपर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केले आणि 2017 साली दोघांनी इटलीत लग्न केले.

Web Title: anushka sharma wish fathers on his birthday share adorable photo with vamika