​अनुष्का शर्मा महिला पहेलवानाच्या भूमिकेत झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 15:45 IST2016-05-26T10:15:43+5:302016-05-26T15:45:43+5:30

क्रीडापटूंच्या आयुष्यावर किंवा खेळांवर तयार करण्यात आलेल्या चित्रपटांना भारतात सरुवातीपासूनच पसंती मिळाली आहे. गेल्या काही वर्षांत तर भाग मिल्खा ...

Anushka Sharma will be seen in the role of Phelnamavana | ​अनुष्का शर्मा महिला पहेलवानाच्या भूमिकेत झळकणार

​अनुष्का शर्मा महिला पहेलवानाच्या भूमिकेत झळकणार

रीडापटूंच्या आयुष्यावर किंवा खेळांवर तयार करण्यात आलेल्या चित्रपटांना भारतात सरुवातीपासूनच पसंती मिळाली आहे. गेल्या काही वर्षांत तर भाग मिल्खा भाग, मेरी कोम या चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.


काही दिवसांतच सलमान खानचाही कुस्तीवर आधारीत असलेला सुलतान चित्रपट प्रदर्शित होत आहे. बुधवारीच त्याचे ट्रेलर रिलीज करण्यात आले. यात अनुष्का शमार्ही महिला पहिलवानाच्या भूमिकेत दिसणार आहे. अनुष्काने तिची भूमिका अगदी चोख बजावल्याचे दिसते. पण प्रत्यक्षात भारताची पहिली महिला पहिलवान कोण होती, हे तुम्हाला माहिती आहे का.

सोनिका कालीरमन या भारताच्या पहिल्या महिला पहिलवान आहेत. प्रसिद्ध पहिलवान चंदगी राम यांच्या त्या कन्या आहेत. मुलगा जगदीश आणि मुलगी सोनिका या दोघांनाही चंदगी राम यांनी याच क्षेत्रामध्ये उतरवले होते.

Web Title: Anushka Sharma will be seen in the role of Phelnamavana