अरेच्चा ! अनुष्का शर्मा नाही तर बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री होती विराट कोहलीची पहिली चॉईस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 18:22 IST2019-07-08T18:17:18+5:302019-07-08T18:22:04+5:30

क्रिकेट आणि बॉलिवूडचं नातं तसे जुने आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचं नावं सुद्धा अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं होते.

Before anushka sharma, virat kohli was dating tamannaah bhatia | अरेच्चा ! अनुष्का शर्मा नाही तर बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री होती विराट कोहलीची पहिली चॉईस

अरेच्चा ! अनुष्का शर्मा नाही तर बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री होती विराट कोहलीची पहिली चॉईस

ठळक मुद्देदोघांची ओळख एका अ‍ॅड शूट दरम्यान झाली होती

क्रिकेट आणि बॉलिवूडचं नातं तसे जुने आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचं नावं सुद्धा अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं होते. 2012मध्ये विराट आणि अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या अफेअरची चर्चा होती. दोघांची ओळख एका अ‍ॅड शूट दरम्यान झाली होती. या दोघांनी हे नातं कधीट स्वीकारले नाही. काहीकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघे वेगळं झाले. तमनाशी ब्रेकअप झाल्यानंतर ब्राझीलियन मॉडेल इजाबेल लेटेला डेट करु लागला. ऐवढेच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीत तमन्नानं पदार्पण केले त्यावेळी विराटची गर्लफ्रेंड म्हणूनच तिच्याकडे पाहिलं जात होतं. जिच्यामुळे तमन्नाशी विराटचे ब्रेकअप झालं ती ब्राझिलिअन मॉडेल इजाबेल हिच्याशी विराटचे सूर जुळले. दिग्दर्शक राज पुरोहित यांनी सिक्स्टीन या सिनेमासाठी इजाबेल हिला साईन करण्यात आलं होतं. 


फिल्मफेयरला  दिलेल्या मुलाखतीत तमन्ना म्हणाली होती की, ''त्या अॅड शूटनंतर मी कधीच विराटला भेटले नव्हते तसेच आमच्यात कधीचं काही बोलणं झाले नाही.'' 


विराटचे इजाबेलशी ब्रेकअप झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात अनुष्का शर्माने एंट्री घेतली  यशाच्या शिखरावर असलेल्या अनुष्का आणि विराटला एका कंपनीने जाहीरातीसाठी एकत्र कास्ट केले होते. असे म्हणतात की, दोघांची मैत्री इथूनच सुरू झाली. पुढे याच मैत्रीचे हळूहळू प्रेमात रुपांतर झाले. तेव्हापासून दोघांच्या प्रेमाचे किस्से रंगू लागले.  जवळपास 4 वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर विराट-अनुष्का 2017मध्ये रेशीमगाठीत अडकले. दोघांनी इटलीमध्ये  ४२ पाहुण्याच्या उपस्थिक सीक्रेट मॅरेज केले. 

Web Title: Before anushka sharma, virat kohli was dating tamannaah bhatia