तुझे हे फोटो कुणी काढले...?  ‘ते’ फोटो पाहून विराटला पडला प्रश्न; अनुष्काचं मजेशीर उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 15:40 IST2021-08-02T15:36:38+5:302021-08-02T15:40:42+5:30

तूर्तास अनुष्काच्या फोटोवरची एक कमेंट सर्वांचं लक्ष वेधून घेतेय. होय, अनुष्काच्या सुंदर फोटोंवर विराटनं कमेंट केलीय आणि त्याच्या या कमेंटला अनुष्कानं तेवढंच खास उत्तर दिलंय.

Anushka Sharma teases Virat Kohli after he asks for photography credit |  तुझे हे फोटो कुणी काढले...?  ‘ते’ फोटो पाहून विराटला पडला प्रश्न; अनुष्काचं मजेशीर उत्तर

 तुझे हे फोटो कुणी काढले...?  ‘ते’ फोटो पाहून विराटला पडला प्रश्न; अनुष्काचं मजेशीर उत्तर

ठळक मुद्देअनुष्कानं काही दिवसांपूर्वी या ट्रिपचे काही ग्रूप फोटोही शेअर केले होते.  

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) व क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) हे बॉलिवूडचं लोकप्रिय कपल आहे. साहजिकच, या ना त्या कारणानं दोघांची चर्चा होत राहते. सध्या विरूष्का लेक वामिकासोबत लंडनमध्ये आहेत आणि येथील  या सुंदर कपलचे सुंदर फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.  तूर्तास अनुष्काच्या फोटोवरची एक कमेंट सर्वांचं लक्ष वेधून घेतेय. होय, अनुष्काच्या सुंदर फोटोंवर विराटनं कमेंट केलीय आणि त्याच्या या कमेंटला अनुष्कानं तेवढंच खास उत्तर दिलंय.

अनुष्कानं लंडनच्या रस्त्यावरचे काही स्टनिंग फोटो इन्स्टावर शेअर केलेत. चहूबाजूंनी हिरवळ, मधोमध काळा डांबरी रस्ता आणि या रस्त्यावर खळखळून हसणारी अनुष्का..., हे फोटो पाहून चाहते क्रेझी झालेत. तिचे हे फोटो पाहून विराटही कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही.  

‘तुझे हे फोटो कुणी काढले...?’ असा प्रश्न त्यानं कमेंट करत लिहिला. त्यावर अनुष्कानं मजेशीर अंदाजात उत्तर दिलं. ‘माझ्या एका चांगल्या चाहत्याने..,’ असं तिनं लिहिलं. आता हा चाहता कोण तर खुद्द तिचा नवरा विराट, हे नव्यानं सांगायला नकोच. याआधीही विराटनं अनुष्काचे अनेक फोटो क्लिक केले आहेत. शिवाय मी अनुष्काचा खूप मोठा फॅन आहे, हेही त्यानं अनेक मुलाखतीत सांगितलं आहे.
अनुष्कानं काही दिवसांपूर्वी या ट्रिपचे काही ग्रूप फोटोही शेअर केले होते.   या फोटोंमध्ये ती इंडियन क्रिकेट टीममधील खेळाडूंसोबत आणि सुनील शेट्टीची मुलगी आथिया शेट्टीसोबत दिसली होती. अथिया सध्या तिचा बॉयफ्रेन्ड आणि क्रिकेटपटू के.एल. राहुलसोबत एन्जॉय करतेय.

Web Title: Anushka Sharma teases Virat Kohli after he asks for photography credit