पुन्हा एकदा ‘सुल्तान’सोबत झळकणार अनुष्का शर्मा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 18:29 IST2018-12-09T18:28:57+5:302018-12-09T18:29:35+5:30

‘सुल्तान’ या सुपरहिट चित्रपटानंतर अनुष्का पुन्हा एकदा ‘सुल्तान’ सलमान खानसोबत दिसणार आहे.

Anushka Sharma to team up with Salman Khan for a Sanjay Leela Bhansali film? | पुन्हा एकदा ‘सुल्तान’सोबत झळकणार अनुष्का शर्मा!

पुन्हा एकदा ‘सुल्तान’सोबत झळकणार अनुष्का शर्मा!

ठळक मुद्देतूर्तास अनुष्का प्रचंड बिझी आहे. या वर्षभरात अनुष्काचे एकापाठोपाठ एक असे अनेक चित्रपट रिलीज झालेत.

सलमान खान आणि अनुष्का शर्मा ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसू शकते.  २०१६ मध्ये रिलीज झालेल्या ‘सुल्तान’ या चित्रपटात सलमान व अनुष्का एकत्र दिसले होते. बॉक्सआॅफिसवर या जोडीने धम्माल केली होती. आता या सुपरहिट चित्रपटानंतर अनुष्का पुन्हा एकदा ‘सुल्तान’सोबत दिसणार आहे. विशेष म्हणजे अनुष्काचा हा चित्रपट संजय लीला भन्साळी दिग्दर्शित करत आहेत. याचा अर्थ हा नेहमीप्रमाणे भन्साळींचा ‘लार्जर दॅन लाईफ’ सिनेमा असणार आहे, हे नक्की.  अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण असे असले तरी केवळ बातमीनेच चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. सलमान, अनुष्का अन् भन्साळी एकत्र येणार म्हटल्यावर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी आपण संजय लीला भन्साळींसोबत काम करणार असल्याचे सलमानने म्हटले होते. कदाचित सलमानच्या याच चित्रपटात अनुष्काची वर्णी लागली असावी.

तूर्तास अनुष्का प्रचंड बिझी आहे. या वर्षभरात अनुष्काचे एकापाठोपाठ एक असे अनेक चित्रपट रिलीज झालेत. आधी तिचा हॉरर चित्रपट‘परी’ रिलीज झाला. यानंतर ती वरूण धवनसोबत ‘सुई धागा’मध्ये दिसली. ‘संजु’ या चित्रपटातही ती झळकली. लवकरच तिचा ‘झिरो’ हा चित्रपट दिसणार आहे. यात ती शाहरुख खान व कॅटरिना कैफसोबत दिसेल. येत्या २१ डिसेंबरला हा बहुप्रतिक्षीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

सलमानचे म्हणाल तर सलमान सध्या ‘भारत’ या चित्रपटात व्यस्त आहे. अली अब्बास दिग्दर्शित या चित्रपटात भाईजान कॅटरिना कैफसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटाशिवाय तो ‘बिग बॉस 12’ होस्ट करतोय.

Web Title: Anushka Sharma to team up with Salman Khan for a Sanjay Leela Bhansali film?