अनुष्का शर्माला झाला हा आजार! प्रचंड वेदना सहन करत करतेय ‘सुई-धागा’चे प्रमोशन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 09:52 IST2018-09-06T09:51:04+5:302018-09-06T09:52:44+5:30

चित्रपटाचे शूटींग आणि नंतर त्याचे प्रमोशनमध्ये कलाकार रात्रंदिवस व्यस्त असतात. अनेकदा या धावपळीत शरीर पोखरत चाललेल्या आजारांकडे त्यांचे दुर्लक्ष होते. आता अनुष्का शर्माचेच घ्या. वरवर एकदम फिट दिसणाऱ्या अनुष्काला बलगिंग डिस्क नामक आजाराने ग्रासले आहे. 

Anushka Sharma Suffering From Bulging Disc | अनुष्का शर्माला झाला हा आजार! प्रचंड वेदना सहन करत करतेय ‘सुई-धागा’चे प्रमोशन!!

अनुष्का शर्माला झाला हा आजार! प्रचंड वेदना सहन करत करतेय ‘सुई-धागा’चे प्रमोशन!!

बॉलिवूड कलाकारांचे आयुष्य वरवर ऐशोआरामाचे भासत असले तरी, त्यामागे बरेच कष्ट असतात. चित्रपटाचे शूटींग आणि नंतर त्याचे प्रमोशनमध्ये कलाकार रात्रंदिवस व्यस्त असतात. अनेकदा या धावपळीत शरीर पोखरत चाललेल्या आजारांकडे त्यांचे दुर्लक्ष होते. आता अनुष्का शर्माचेच घ्या. वरवर एकदम फिट दिसणाऱ्या अनुष्काला बलगिंग डिस्क नामक आजाराने ग्रासले आहे. या आजारामुळे अनुष्काला आजकाल प्रचंड शारीरिक वेदना सहन कराव्या लागत आहेत. अनुष्काला इंटेन्सिव फिजिओथेरपी सेशनमुळे बलगिंग डिस्कने ग्रासले. यामुळे अनुष्का एकाठिकाणी फार वेळ बसू शकत नाही. सध्या ती यावर उपचार घेतेय. या आजारातून बरे व्हायला अनुष्का तीन ते चार आठवडे लागतील. खरे तर डॉक्टरांनी अनुष्काला पूर्णपणे बेड रेस्ट सांगितला आहे. पण अनुष्काने डॉक्टरांचा हा सल्ला फार मनावर घेतलेला नाही. तूर्तास ती वरूण धवनसोबतसुई-धागा’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रचंड त्रास असूनही सतत प्रवास आणि अनेक शोमध्ये ती हजेरी लावतेय. आपल्यामुळे चित्रपटाच्या मार्केटींगवर कुठलाही परिणाम होऊ नये, असा तिचा प्रयत्न आहे.

'मेड इन इंडिया' अशी टॅगलाइन असलेल्या ‘सुई-धागा’ या सिनेमाची कथा मध्य प्रदेशात रंगणार आहे. या ठिकाणी बहुतांशी नागरिक येण्या जाण्यासाठी सायकलचा वापर करतात. त्यामुळे सुई धागा सिनेमात वरुण-अनुष्का सायकलवर फिरताना पाहायला मिळणार आहेत.   ‘सुई-धागा’ या सिनेमातून हे दोघंही आजवर कधीही पाहिलं नाही अशा अनोख्या अंदाजात रुपेरी पडद्यावर झळणार आहेत. या सिनेमात वरुण धवन टेलरच्या भूमिकेत झळकणार असून मौजी असं त्याच्या व्यक्तीरेखेचे नाव असेल. दुसरीकडे अनुष्का कपड्यांवर नक्षीकाम (एम्ब्रॉयडरी) करणा-या ममताच्या भूमिकेत झळकणार आहे.  

Web Title: Anushka Sharma Suffering From Bulging Disc