अनुष्का शर्मासह लव्ह स्टोरी सुरु होण्याआधी बॉलिवूडच्या 'या' दोन हिरोईनसोबत होतं विराट कोहलीचं 'अफेअर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 12:00 IST2017-12-14T06:30:44+5:302017-12-14T12:00:44+5:30

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीवर कित्येक तरुणी फिदा आहेत. मात्र मिस्टर कोहलीला बॉलीवुडची अभिनेत्री अनुष्का शर्माने क्लीन बोल्ड ...

Before Anushka Sharma started the love story, there were two Bollywood heroes associated with Virat Kohli's 'affair' | अनुष्का शर्मासह लव्ह स्टोरी सुरु होण्याआधी बॉलिवूडच्या 'या' दोन हिरोईनसोबत होतं विराट कोहलीचं 'अफेअर'

अनुष्का शर्मासह लव्ह स्टोरी सुरु होण्याआधी बॉलिवूडच्या 'या' दोन हिरोईनसोबत होतं विराट कोहलीचं 'अफेअर'

रतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीवर कित्येक तरुणी फिदा आहेत. मात्र मिस्टर कोहलीला बॉलीवुडची अभिनेत्री अनुष्का शर्माने क्लीन बोल्ड केलं. नुकतंच इटलीमध्ये विराट आणि अनुष्काचे शुभमंगल पार पडलं. दोघांच्या लग्नाची बातमी ऐकून दोघांच्या फॅन्सच्या काळजाचे जणू तुकडे झाले. विराटचे चाहते तर जगभरात आहेत. भारतासह पाकिस्तान, बांगलादेशपासून प्रत्येक देशात कोहलीवर तरुणी लट्टू आहेत. मात्र त्याच्या लग्नाची बातमी ऐकून अनेक जणींचा हिरमोड झाला आहे. विराट आणि अनुष्काची जोडी रब ने बना दी जोडी असल्याचे बोललं जात आहे. मात्र कोहलीच्या आयुष्यात अनुष्का येण्याआधी बॉलीवुडच्या आणखी दोन अभिनेत्री आल्या होत्या. या दोघींना कोहलीने डेटही केले होते. 2012 साली बाहुबली फेम आणि दाक्षिणात्य सिनेमातील अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला विराटने डेट करण्यास सुरुवात केली होती. एका मोबाईलच्या जाहिरातीच्या शुटिंगच्या वेळी कोहली आणि तमन्ना यांची पहिल्यांदा भेट झाली. मात्र ही जाहिरात काही इतकी प्रसिद्ध ठरली नाही. ब्राझिलिअन मॉडेल इजाबेल लेटेमुळे विराट आणि तमन्नाच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्याही चर्चा ऐकायला मिळाल्या. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत दोघांचं ब्रेकअप झालं. इतकंच नाहीतर हिंदी चित्रपटसृष्टीत तमन्नानं पदार्पण केले त्यावेळी विराटची गर्लफ्रेंड म्हणूनच तिच्याकडे पाहिलं जात होतं. जिच्यामुळे तमन्नाशी विराटचे ब्रेकअप झालं ती ब्राझिलिअन मॉडेल इजाबेल हिच्याशी विराटचे सूर जुळले. दिग्दर्शक राज पुरोहित यांनी सिक्स्टीन या सिनेमासाठी इजाबेल हिला साईन करण्यात आलं होतं. या सिनेमासाठी इजाबेल बराच काळ भारतात होती.त्याच दरम्यान एका पार्टीत विराट आणि इजाबेल यांची भेट झाली. यानंतर सिंगापूरमध्येही दोघांना एकत्र वेळ घालवताना पाहिलं गेलं.विराटला जवळपास 2 वर्ष डेट केल्याची कबुली खुद्द इजाबेलने दिली होती. दोघांची लव्ह स्टोरी फार काळ टिकली नसली तरी यानिमित्ताने इजाबेलला बॉलिवूडमध्ये आणि भारतात स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी लाभली. विराटशी ब्रेकअप झाल्यानंतर इजाबेलने सिद्धार्थ मल्होत्राला डेट करणं सुरु केलं.तर तिकडे 2013 साली विराटच्या आयुष्यात अनुष्का शर्माची एंट्री झाली आणि दोघांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली. जवळपास 4 वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर विराट-अनुष्का रेशीमगाठीत अडकले आहेत. 

Also Read:VIDEO:आयुष्यभर तुझी साथ निभावेन,रोमँटिक अंदाजात विराटची अनुष्काला प्रेमाची कबुली

Web Title: Before Anushka Sharma started the love story, there were two Bollywood heroes associated with Virat Kohli's 'affair'