मुलगा अकायच्या जन्मानंतर अनुष्का शर्मानं शेअर केला पहिला फोटो, चाहते म्हणाले - "दोन मुलांची आई आहे यावर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 16:14 IST2024-03-28T16:14:08+5:302024-03-28T16:14:29+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) गेल्या काही महिन्यांपासून लंडनमध्ये आहे. १५ फेब्रुवारी रोजी अनुष्काने लंडनमध्येच मुलाला जन्म दिला. २० फेब्रुवारीला विराट आणि अनुष्काने ही गुडन्यूज सोशल मीडियावर शेअर केली.

Anushka Sharma shared the first photo after the birth of son Akay, fans said - "On being a mother of two children..." | मुलगा अकायच्या जन्मानंतर अनुष्का शर्मानं शेअर केला पहिला फोटो, चाहते म्हणाले - "दोन मुलांची आई आहे यावर..."

मुलगा अकायच्या जन्मानंतर अनुष्का शर्मानं शेअर केला पहिला फोटो, चाहते म्हणाले - "दोन मुलांची आई आहे यावर..."

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) गेल्या काही महिन्यांपासून लंडनमध्ये आहे. १५ फेब्रुवारी रोजी अनुष्काने लंडनमध्येच मुलाला जन्म दिला. २० फेब्रुवारीला विराट आणि अनुष्काने ही गुडन्यूज सोशल मीडियावर शेअर केली. तसेच मुलाचे नाव 'अकाय' ठेवण्यात आल्याचेही सांगितले. दरम्यान आता अकायच्या जन्मानंतर तिने सोशल मीडियावर पहिला फोटो शेअर केला आहे. फोटोतील तिचे फिटनेस पाहून चाहते थक्क झाले आहेत. 

अखेर अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. मुलगा अकायच्या जन्मानंतर पहिल्यांदाच विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने फोटो शेअर केला आहे. हा फोटो नवीन आहे की जुना हे सांगता येत नाही. पण या फोटोत ती एकदम फिट दिसत आहे. अनुष्काचा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येऊ लागल्या आहेत. 

एक महिन्याहून अधिक काळ लोटला. पण अनुष्का शर्माने सोशल मीडियावर एकही पोस्ट टाकली नाही. आता २८ मार्च रोजी अभिनेत्रीने एक फोटो पोस्ट करताच सर्वजण ते पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच फिट आणि आकर्षक दिसत आहे.

अनुष्का शर्माचा हा फोटो एका जाहिरातीशी संबंधित आहे, ज्यात ती एका फोनची जाहिरात करताना दिसत आहे. एकंदरीतच मुलगा अकायच्या जन्मानंतर तिने कामावर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. याचा पहिला पुरावा म्हणजे ही जाहिरात. जिथे ती व्हाईट शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दिसत आहे.

अनुष्काचा फोटो पाहून चाहते काय म्हणाले?
दुसरीकडे, विराट कोहली आयपीएलमध्ये परतला आहे. अनुष्का शर्माच्या या पोस्टवर बऱ्याच नेटकऱ्यांनी कमेंटी केली आहे.ते सर्व तिला मिस करत आहेत.ती  स्टेडियममध्ये जिथे RCB संघासाठी चीअर करत असे. एका यूजरने लिहिले की, 'अरे अकायची आई.' एका चाहत्याने तर असे म्हटले की, अनुष्का दोन मुलांची आई आहे यावर विश्वास बसत नाही.

Web Title: Anushka Sharma shared the first photo after the birth of son Akay, fans said - "On being a mother of two children..."