दुसऱ्या प्रेग्नंसीच्या चर्चांदरम्यान अनुष्काचा 'तो' Video व्हायरल, सिनेमातून घेणार ब्रेक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 13:55 IST2023-10-01T13:55:02+5:302023-10-01T13:55:59+5:30

सिमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीत तिने लग्न, मुलं याबाबतीत आपलं प्लॅनिंग सांगितलं आहे.

anushka sharma second pregnancy actress may take break from films old video viral | दुसऱ्या प्रेग्नंसीच्या चर्चांदरम्यान अनुष्काचा 'तो' Video व्हायरल, सिनेमातून घेणार ब्रेक?

दुसऱ्या प्रेग्नंसीच्या चर्चांदरम्यान अनुष्काचा 'तो' Video व्हायरल, सिनेमातून घेणार ब्रेक?

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) पॉवरफुल कपल आहे. 'विरुष्का' असं चाहत्यांनी त्यांना नाव दिलंय. दोघांनी आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. २०२१ मध्ये अनुष्काने वामिकाला जन्म दिला. तर आता दोन वर्षांनी अनुष्का दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा आहेत. नुकतंच त्यांना मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केलं. दोघंही काही महिन्यांनी याबाबतीत अधिकृतरित्या खुलासा करतील असं त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितलं. तर दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर अनुष्का कामातून ब्रेक घेणार असल्याचीही चर्चा एका व्हिडिओमुळे सुरु झाली आहे.

अनुष्का शर्माने 'रब ने बना दी जोडी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या तिची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तिने लग्न, मुलं याबाबतीत आपलं प्लॅनिंग सांगितलं आहे. सिमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीत अनुष्काला तुझ्यासाठी लग्न किती महत्वाचं आहे असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अनुष्का म्हणाली,'माझ्यासाठी लग्न खूप महत्वाचं आहे. मला लग्न करायचं आहे, मला मुलं हवी आहेत. आणि लग्न झाल्यानंतर कदाचित मी काम करणं थांबवेल.'

अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे.  याआधी ती 'झिरो' या चित्रपटात शाहरुख खानसोबत दिसली होती. वामिकाच्या जन्मानंतर अनुष्काचा एकही सिनेमा आलेला नाही. आता दुसऱ्या प्रेग्नंसीच्या चर्चांमुळे अनुष्का सिनेमातून गायब होणार यामुळे चाहते मात्र निराश झालेत.

Web Title: anushka sharma second pregnancy actress may take break from films old video viral