अन् अनुष्का शर्मा पोहोचली नंबर वनवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 16:21 IST2018-09-28T16:18:20+5:302018-09-28T16:21:04+5:30

अनुष्का शर्मा आणि वरुण धवनचा सुई धागा सिनेमा आजच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेले काही दिवसांपासून अभिनेत्री अनुष्का सर्वत्र  ‘सुई धागा’ सिनेमाचे प्रमोशन करताना दिसली होती.

Anushka Sharma reached number one | अन् अनुष्का शर्मा पोहोचली नंबर वनवर

अन् अनुष्का शर्मा पोहोचली नंबर वनवर

ठळक मुद्दे‘सुई-धागा’ या सिनेमाची कथा मध्य प्रदेशात रंगणारी आहे.स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर अनुष्का शर्मा एक नंबरवर पोहोचली आहे.

अनुष्का शर्मा आणि वरुण धवनचा सुई धागा सिनेमा आजच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेले काही दिवसांपासून अभिनेत्री अनुष्का सर्वत्र  ‘सुई धागा’ सिनेमाचे प्रमोशन करताना दिसली होती. हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच अनुष्काला सिनेमाचा चांगलाच फायदा झालेला दिसून येतोय. सुई धागाविषयक सर्व डिजीटल प्लॅटफॉर्म्सवर सतत चालत असलेल्या बातम्यांमुळे स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर अनुष्का शर्मा एक  नंबरवर पोहोचली  आहे. या शर्यतीत अनुष्काने श्रद्धाला मागे टाकले आहे.  स्त्री सिनेमाच्या लोकप्रियतेमुळे याअगोदर श्रध्दा कपूर डिजीटल जगतात नंबर वन अभिनेत्री बनली होती. आता अनुष्काने श्रध्दाला लोकप्रियतेत मागे टाकले आहे. 

स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह संस्थापक अश्वनी कौल सांगतात, “सुई धागाच्या प्रमोशनच्यावेळी अनुष्काच्या भूमिकेला धरून सोशल मीडिया आणि डिजीटल प्लॅटफॉर्मवर भरपूर मेम्स झाले. ह्यामुळेच फिल्मचे प्रमोशन आणि मीडिया इंटरव्ह्युच्याशिवाय या मेम्समुळेही अनुष्काची लोकप्रियता डिजीटल जगतात वाढत राहिली.“

अनुष्का शर्मा सध्या 100 गुणांसह नंबर वन स्थानी तर ‘स्त्री’ श्रध्दा कपूर 85 गुणांसह दूस-या स्थानी आहे. ‘मनमर्जिया’ एक्टरेस तापसी पन्नू 77 गुणांसह तीस-या स्थानी, दीपिका 62 गुणांसह चौथ्या स्थानी आणि प्रियंका 51 गुणांसह पांचव्या स्थानी आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

अश्वनी कौल म्हणतात, “14 भारतीय भाषांमधल्या 500हून अधिक न्यूज वेबसाइटमध्ये बॉलीवूड सेलिब्रिटीच्याविषयी लिहीलेल्या बातम्यांच्या अनूसार तारे-तारकांची लोकप्रियता समजते. गेल्या काही दिवसांमध्ये डिजीटल दूनियेत अनुष्काच्या मुलाखती, विडीयो, आर्टिकल आणि न्यूजच सर्वाधिक दिसत होती. “

'मेड इन इंडिया' अशी टॅगलाइन असलेल्या ‘सुई-धागा’ या सिनेमाची कथा मध्य प्रदेशात रंगणारी आहे. ‘सुई-धागा’ या सिनेमातून हे दोघंही आजवर कधीही पाहिलं नाही अशा अनोख्या अंदाजात रुपेरी पडद्यावर झळकता येत. या सिनेमात वरुण धवन टेलरच्या भूमिकेत असून मौजी असं त्याच्या व्यक्तीरेखेचे नाव आहे. दुसरीकडे अनुष्का कपड्यांवर नक्षीकाम (एम्ब्रॉयडरी) करणा-या ममताच्या भूमिकेत दिसतेय.  
 

Web Title: Anushka Sharma reached number one