विराटच्या अनुष्काला लागलीय ही विचित्र सवय; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 11:33 IST2019-09-19T11:32:47+5:302019-09-19T11:33:40+5:30

अभिनेत्री अनुष्का शर्मा ‘झिरो’ या चित्रपटात अखेरची दिसली होती. तेव्हापासून तिचा एकही सिनेमा प्रदर्शित झालेला नाही. अर्थात असे असले तरी या ना त्या कारणाने ती सतत चर्चेत असते.

anushka sharma post hilarous video yawning at work video goes viral | विराटच्या अनुष्काला लागलीय ही विचित्र सवय; पाहा व्हिडीओ

विराटच्या अनुष्काला लागलीय ही विचित्र सवय; पाहा व्हिडीओ

ठळक मुद्देअलीकडे फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत अनुष्काने चित्रपटातून ब्रेक घेतल्याबद्दल खुलासा केला होता.

अभिनेत्री अनुष्का शर्मा ‘झिरो’ या चित्रपटात अखेरची दिसली होती. तेव्हापासून तिचा एकही सिनेमा प्रदर्शित झालेला नाही. अर्थात असे असले तरी या ना त्या कारणाने ती सतत चर्चेत असते. कधी पती विराट कोहलीसोबतच्या रोमॅन्टिक फोटोंमुळे तर कधी त्याच्या सोबतच्या व्हॅकेशनमुळे. मात्र सध्या अनुष्का एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. होय, अनुष्काला एक विचित्र सवय जडली आहे.
अनुष्काने नुकताच इन्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत तिने तिच्या विचित्र सवयीबद्दल सांगितले आहे. सध्या हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अनुष्का काम करताना अनेकदा जांभई देताना दिसत आहे.



 

ती वारंवार जांभई देतेय. पण ‘काम करताना मी कधीच जांभई देत नाही,अजिबात नाही...’ असे मजेशीर कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे.  व्हिडीओमध्ये बॅकग्राउंड म्युझिक म्हणून वेस्टर्न म्युझिक वापरण्यात आले आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.




गतवर्षी अनुष्काचे परी, संजू, सुईधागा व झिरो असे चार चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र डिसेंबरला ‘झिरो’ प्रदर्शित झाल्यानंतर तिने कोणताच नवा प्रोजेक्ट साईन केला नाही. साहजिकच यामुळे बºयाच अफवांना उधाण आले. इतकेच नाही तर अनुष्का बॉलिवूडला रामराम ठोकणार  असल्याचीही चर्चा पसरली. मात्र ही सगळी वृत्त खोटी ठरली.




अलीकडे फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत अनुष्काने चित्रपटातून ब्रेक घेतल्याबद्दल खुलासा केला होता. ‘ झिरो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मी काही महिने ब्रेक घेतला आहे. लग्नानंतर लगेच मी सुई धागाच्या सेटवर परतली आणि नंतर झिरोचे शूटींग केले. यातून जो काही वेळ मिळायचा तो मी विराटला दिला. पण यानंतर मला ब्रेक हवा, असे मला प्रकर्षाने जाणवले आणि मी तो घेतला,’ असे ती म्हणाली होती.

 


Web Title: anushka sharma post hilarous video yawning at work video goes viral