'चित्रपट संन्यास' वगैरे काही नाही; ‘झिरो’नंतर हा असेल अनुष्का शर्माचा नवा चित्रपट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 14:45 IST2019-06-17T14:42:27+5:302019-06-17T14:45:18+5:30

बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा हिने ‘सुई धागा’ आणि ‘झिरो’नंतर एकही चित्रपट साईन केलेला नाही. काही दिवसांपूर्वी अनुष्काने अभिनयातून संन्यास घेतल्याची चर्चा सुरु झाली होती, ती त्याचमुळे.

anushka sharma to play a cop in her next film | 'चित्रपट संन्यास' वगैरे काही नाही; ‘झिरो’नंतर हा असेल अनुष्का शर्माचा नवा चित्रपट!!

'चित्रपट संन्यास' वगैरे काही नाही; ‘झिरो’नंतर हा असेल अनुष्का शर्माचा नवा चित्रपट!!

ठळक मुद्देअनुष्काने या चित्रपटाची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण या चित्रपटाची तयारी मात्र सुरु केली आहे.

बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा हिने ‘सुई धागा’ आणि ‘झिरो’नंतर एकही चित्रपट साईन केलेला नाही. काही दिवसांपूर्वी अनुष्काने अभिनयातून संन्यास घेतल्याची चर्चा सुरु झाली होती, ती त्याचमुळे. अनुष्का अभिनयाऐवजी दिग्दर्शनावर लक्ष केंद्रीत करू इच्छिते, अशीही चर्चा होती.  पण या चर्चेत काहीही तथ्य नव्हते, हे आता नव्याने स्पष्ट झाले आहे. कारण अनुष्काने तिच्या नव्या चित्रपटाची तयारी सुरु केली आहे. होय, चर्चा खरी मानाल तर आपल्या नव्या चित्रपटात अनुष्का लेडी इन्स्पेक्टरची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामुळे अनुष्काने अभिनय सोडल्याची किंवा अभिनयातून संन्यास घेतल्याची चर्चा निव्वळ निराधार आहे.


डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, अनुष्काने एक क्रॉप ड्रामा साईन केला आहे. अद्याप अनुष्काने या चित्रपटाची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण या चित्रपटाची तयारी मात्र सुरु केली आहे. या भूमिकेसाठी बॉडी लँग्वेज आणि अन्य बाबींवर ती खास लक्ष देत असल्याचे कळतेय.


कायम उत्तम स्क्रिप्ट निवडण्यावर अनुष्काचा भर राहिला आहे. या चित्रपटाची स्क्रिप्टही अनुष्काला आवडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटातील अनुष्काची भूमिका आव्हानात्मक आहे आणि यासाठी तिला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. तूर्तास या चित्रपटाचे नाव वा अन्य तपशील समोर आलेला नाही.  


लवकरच करिना कपूर ‘हिंदी मीडियम 2’ या चित्रपटात महिला पोलिस अधिका-याची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘मर्दानी 2’ या चित्रपटात राणी मुखर्जीही लेडी इन्स्पेक्टरची भूमिका वठवणार आहे. आता करिना व राणी पाठोपाठ अनुष्काही लेडी इन्स्पेक्टर साकारणार आहे.  

Web Title: anushka sharma to play a cop in her next film