अरेच्चा, हे काय अनुष्काच्या डुप्लीकेटला एका दिवसासाठी बनयाचंय मिसेस विराट कोहली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 16:48 IST2019-02-08T16:40:59+5:302019-02-08T16:48:42+5:30

गेल्या काही दिवसांपासून अनुष्का शर्माच्या डुप्लीकेट म्हणून ज्युलिया चे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. खरंतर आपण जुळ्या आहोत असे खुद्द ज्युलियानेच अनुष्काला ट्विट करत सांगितले होते.

Anushka Sharma Look a like julia Michaels Asked Could Have Husband Virat kohli for a day | अरेच्चा, हे काय अनुष्काच्या डुप्लीकेटला एका दिवसासाठी बनयाचंय मिसेस विराट कोहली?

अरेच्चा, हे काय अनुष्काच्या डुप्लीकेटला एका दिवसासाठी बनयाचंय मिसेस विराट कोहली?

बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख, अनिल कपूर, आमिर खान, आलिया भट्ट अशा एक ना अनेक गाजलेल्या कलाकारांचे सेम टू सेम भासावे असे डुप्लिकेट आहेत. अशाच सेम टू सेम दिसणा-या व्यक्तींमध्ये अनुष्का शर्माची डुप्लीकेटचे अमेरिकन सिंगर ज्युलिया माइकलचाही समावेश झाला आहे.



 

 

गेल्या काही दिवसांपासून अनुष्का शर्माच्या डुप्लीकेट म्हणून ज्युलिया चे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. खरंतर आपण जुळ्या आहोत असे खुद्द ज्युलियानेच अनुष्काला ट्विट करत सांगितले होते. यावर अनुष्कानेही रिप्लाय करत म्हटले होते की, आश्चर्य आहे, मी तुला आणि उरलेल्या 5 लोकांना शोधत होते." 

अनुष्काने रिप्लाय दिल्यानंतर  ज्युलिया  इथवरच थांबली नाही. तिच्नेया अपेक्षा आणखी वाढत गेल्याचे दिसले. अनुष्काने बोट दिले पण आता ज्युलियाने तिचा हातच पकडायला सुरूवात केली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण ज्युलियाने थेट तिला एका दिवसाठी विराटची पत्नी बनायचे असल्याची इच्छाच अनुष्काला बोलून दाखवली आहे. यावर अनुष्का काय रिप्लाय करणार याकडेच खरे तर सा-यांचे लक्ष लागले आहे. मात्र सध्या तरी अनुष्काने ज्युलियाला  रिप्लाय देणे टाळले आहे. ज्युलियाच्या प्रत्येक ट्विटला रिप्लाय करणा-या अनुष्काने अचानक रिप्लाय देणे बंद केले यावरून ''कुछ तो गडबड है'' असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण, हीच बाब अनुष्कालाही चांगलीच झोंबली असणार हे मात्र नक्की.  

ज्युलियाच्या या ट्वीटवर अनुष्का-विराटने काहीच रिप्लाय दिलेला नसला तरी विरूष्काच्या चाहत्यांनी मात्र याला रिप्लाय देत चांगलीच धूम उडवून दिली आहे. एका  यूजरने तर थेट लिहिले आहे की, "अच्छा तर, तुला एका दिवसासाठी विराट कोहली हवा आहे काय..." ज्युलियाच्या एका ट्विटमुळे अशा एक से भन्नाट कमेंटसचा सोशल मीडियावर वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे.  


 

Web Title: Anushka Sharma Look a like julia Michaels Asked Could Have Husband Virat kohli for a day