अनुष्का शर्मानं दिलं होतं '३ इडियट्स'साठी ऑडिशन, आता व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 18:17 IST2021-04-30T18:14:10+5:302021-04-30T18:17:04+5:30

अभिनेत्री अनुष्का शर्माचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे

Anushka Sharma had auditioned for '3 Idiots', now the video is going viral | अनुष्का शर्मानं दिलं होतं '३ इडियट्स'साठी ऑडिशन, आता व्हिडीओ होतोय व्हायरल

अनुष्का शर्मानं दिलं होतं '३ इडियट्स'साठी ऑडिशन, आता व्हिडीओ होतोय व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. दरम्यान आता तिचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडीओत अनुष्का शर्मा '३ इडियट्स' चित्रपटाचे ऑडिशन देताना दिसत आहे. यात ती 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसत आहे.

ऑडिशनमध्ये अनुष्का बोलत असलेले डायलॉग चित्रपटात ग्रेसी सिंग बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती यंग दिसत आहे. तिने हिरवा टॉप घातला आहे. अनुष्काच्या व्हिडीओवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. पण '३ इडियट्स' चित्रपटात अनुष्काची निवड झाली नव्हती.


मात्र ५ वर्षांनंतर राजकुमार हिराणीच्या 'पीके' चित्रपटात अनुष्का शर्मा अभिनेता आमिर खानसोबत झळकली होती. चित्रपटात तिने एका पत्रकाराची भूमिका साकारली होती. चित्रपटात दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने देखील काम केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली होती.


अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर शेवटची ती शाहरूख खानसोबत झिरो चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही.

 
अनुष्काने गेल्या ११ जानेवारीला वामिकाला जन्म दिला. वामिकाच्या जन्माला आता चार महिने पूर्ण होणार आहेत. पण या चार महिन्यात अद्यापही वामिकाचा चेहरा दिसलेला नाही. अनुष्का व विराटने लेकीचे फोटो शेअर केलेत. पण हे फोटो शेअर करताना वामिकाचा चेहरा दिसणार नाही, याची त्यांनी पूरेपूर काळजी घेतली.

Web Title: Anushka Sharma had auditioned for '3 Idiots', now the video is going viral