प्रेग्नेंट अनुष्का शर्मा घेतेय पाणीपुरी खाण्याचा आनंद, इन्स्टावर शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 12:50 IST2021-01-09T12:46:28+5:302021-01-09T12:50:28+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा या महिन्यात आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.

Anushka sharma is eating panipuri at home shares a picture on instagram | प्रेग्नेंट अनुष्का शर्मा घेतेय पाणीपुरी खाण्याचा आनंद, इन्स्टावर शेअर केला फोटो

प्रेग्नेंट अनुष्का शर्मा घेतेय पाणीपुरी खाण्याचा आनंद, इन्स्टावर शेअर केला फोटो

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा या महिन्यात आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. अनुष्काची डिलिव्हरी पाहता विराट कोहलीही ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावरुन परतला आहे. अलीकडेच अनुष्का विराटसोबत डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये जाताना दिसली. आता अनुष्काने सांगितले आहे की, प्रेग्नेंन्सीदरम्यान तिला खूप काही खाण्याची इच्छा होते आहे. अनुष्काने इन्स्टा स्टोरीवर पाणीपुरीचा फोटो शेअर केला आहे.

इन्स्टास्टोरीवर अनुष्काने घरी बसून पाणीपुरी खात असल्याचे सांगितले आहे. विराट आणि अनुष्का घराच्या लॉबीत एकमेकांसोबत क्वॉलिट टाईम स्पेंड करत असताना पाहून काही फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो क्लिक केले होते. हेच फोटो नंतर व्हायरल झाले होते.

विराट कोहली आणि अनुष्का शर्माची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यावेळी दोघे जाहिरातीचे शूटिंग करत होते. त्यापूर्वी विराटने कोणत्या अभिनेत्रीसोबत काम केले नव्हते. त्यामुळे तो सेटवर अनुष्का शर्मासमोर खूप नर्व्हस झाला होता. या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान विराट आणि अनुष्कामध्ये फ्रेंडशीप झाली आणि मग ते दोघे एकमेकांना भेटू लागले. काही कालावधीपर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केले आणि 2017 साली दोघांनी इटलीत लग्न केले.

Web Title: Anushka sharma is eating panipuri at home shares a picture on instagram