ओटीटीवर गाजतोय अनुष्का शर्माचा 'हा' क्राईम थ्रिलर, बजेटच्या तिप्पट कमाई; तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 16:12 IST2026-03-30T16:12:27+5:302026-03-30T16:12:46+5:30

जर तुम्ही क्राईम थ्रिलर चित्रपटांचे चाहते असाल, तर हा चित्रपट तुमच्यासाठी एक उत्तम मेजवानी ठरू शकतो.

Anushka Sharma Crime Thriller Nh10 Movie Ott Zee5 Amazon Prime Review | ओटीटीवर गाजतोय अनुष्का शर्माचा 'हा' क्राईम थ्रिलर, बजेटच्या तिप्पट कमाई; तुम्ही पाहिला का?

ओटीटीवर गाजतोय अनुष्का शर्माचा 'हा' क्राईम थ्रिलर, बजेटच्या तिप्पट कमाई; तुम्ही पाहिला का?

ओटीटीवर दर आठवड्याला वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट प्रदर्शित होतात. मात्र, क्राइम थ्रिलर या जॉनरच्या चित्रपटांची सिनेप्रेमींमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. चाहते जुने चित्रपट पुन्हा-पुन्हा पाहतात. सध्या असाच एक अंगावर शहारे आणणारा 'NH10' हा चित्रपट पुन्हा ट्रेंड होतोय. या चित्रपटात मुख्य भुमिकेत अनुष्का शर्मा असून हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता.

जर तुम्ही क्राईम थ्रिलर चित्रपटांचे चाहते असाल, तर 'NH10' हा चित्रपट तुमच्यासाठी एक उत्तम मेजवानी ठरू शकतो.  हा चित्रपट सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटाची कथा मीरा (अनुष्का शर्मा) आणि अर्जुन (नील भूपालम) या गुरुग्राममध्ये राहणाऱ्या एका विवाहित जोडप्याभोवती फिरते. मीराच्या वाढदिवसानिमित्त हे जोडपे फिरायला बाहेर पडते, पण राष्ट्रीय महामार्ग १० (NH10) वर त्यांचे आयुष्य कायमचे बदलून जाते. प्रवासादरम्यान एका ढाब्यावर त्यांना काही लोक एका तरुण जोडप्याला बळजबरीने पळवून नेताना दिसतात. अर्जुन त्यांना वाचवण्यासाठी मध्यस्थी करतो, पण त्याला कल्पना नसते की तो एका भयानक चक्रव्यूहात अडकणार आहे.

कौटुंबिक प्रतिष्ठेसाठी (Honor Killing) स्वतःच्याच बहिणीची हत्या करणाऱ्या त्या गुंडांचा पाठलाग करताना अर्जुन आणि मीरा स्वतः संकटात सापडतात. संपूर्ण गाव आणि सरपंचही या कृत्यात सामील असल्याचे पाहून मीरा हादरून जाते. अर्जुनची हत्या झाल्यानंतर मीरा ज्या पद्धतीने सूड घेते, तो थरार प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवतो.

कमी बजेट, मोठी कमाई!
दिग्दर्शक नवदीप सिंग यांनी अत्यंत प्रभावीपणे या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. विशेष म्हणजे, 'NH10' हा केवळ १५ कोटी रुपयांच्या मर्यादित बजेटमध्ये तयार झाला होता. मात्र, दमदार कथानक आणि अभिनयामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४४ कोटी रुपयांची मोठी कमाई केली. अनुष्का शर्माने या चित्रपटाद्वारे निर्माती म्हणूनही पदार्पण केले होते.

ओटीटीवर कुठे पाहाल?
१ तास ५५ मिनिटांचा हा वेगवान थ्रिलर सध्या 'ZEE5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. त्यासोबतच तुम्ही हा चित्रपट 'Prime Video' वर देखील पाहू शकता. IMDb वर या चित्रपटाला ७.२ इतके उत्तम रेटिंग मिळाले आहे. जर तुम्हाला वास्तववादी आणि अंगावर येणारा थरार अनुभवायचा असेल, तर 'NH10' हा एक मस्ट-वॉच चित्रपट आहे.

Web Title : अनुष्का शर्मा की 'NH10' क्राइम थ्रिलर OTT पर छाई; ज़रूर देखें!

Web Summary : अनुष्का शर्मा की 'NH10', जो ऑनर किलिंग पर आधारित है, OTT पर फिर से ट्रेंड कर रही है। एक जोड़े की सड़क यात्रा तब घातक हो जाती है जब वे एक अपराध में हस्तक्षेप करते हैं। ₹15 करोड़ के बजट में बनी इस फिल्म ने ₹44 करोड़ कमाए और यह ZEE5 और प्राइम वीडियो पर उपलब्ध है।

Web Title : Anushka Sharma's 'NH10' crime thriller rocks OTT; a must-watch!

Web Summary : Anushka Sharma's 'NH10', a crime thriller about honor killing, is trending again on OTT. A couple's road trip turns deadly when they intervene in a crime. The film, made on a budget of ₹15 crore, earned ₹44 crore and is available on ZEE5 and Prime Video.