आई-बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच कॅमेरा समोर आले अनुष्का शर्मा-विराट कोहली, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 15:06 IST2021-01-21T15:02:37+5:302021-01-21T15:06:44+5:30

आई-बाबा झाल्यानंतर विराट आणि अनुष्का शर्माचा पहिला फोटो समोर आला आहे.

Anushka sharma and virat kohli step out for the first time after their daughter birth | आई-बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच कॅमेरा समोर आले अनुष्का शर्मा-विराट कोहली, See Pics

आई-बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच कॅमेरा समोर आले अनुष्का शर्मा-विराट कोहली, See Pics

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली अलीकडेच आई-बाबा झाले  आहेत. 11 जानेवारीला अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. विराटने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना ही गुडन्युज दिली होती. आई-बाबा झाल्यानंतर विराट आणि अनुष्का शर्माचा पहिला फोटो समोर आला आहे. अनुष्का आणि विराट क्लिनिकमधून निघताना  काही फोटो सोमार आले आहे. ज्यात ती  पूर्वीसारखी फिट अँड फाइन दिसते आहे. या फोटोंमध्ये अनुष्काने डेनिम जीन्स आणि शर्ट घातला आहे ज्यामध्ये ती खूपच मस्त दिसत आहे.तर विराटने ब्लॅक कलरचा शर्ट घेतला आहे. दोघेही फोटोग्राफरवर पोज देताना दिसतायेत. 


 
मुलीच्या जन्मानंतर अनुष्का सोशल मीडियावरही अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. गाबा टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीमच्या ऐतिहासिक विजयाची नोंद केल्यानंतर अनुष्काने इन्स्टाग्रामवर भारतीय टीमचे अभिनंदन केलं होते.

अनुष्का शर्माने इंस्टाग्राम स्टोरीवर क्रिकेट टीमचा फोटो शेयर करून लिहिले होते, काय विजय आहे टीम इंडिया, वाह! आगामी अनेक वर्षांसाठी प्रेरणादायी आहे हा विजय.  प्रेग्नेंन्सीमध्ये ही अनुष्का सुपरअॅक्टिव दिसली होती. 

Web Title: Anushka sharma and virat kohli step out for the first time after their daughter birth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.