अनुष्का शर्मा-विराट कोहली भारताबाहेर; दुसऱ्या बाळाच्या जन्मासाठी पोहोचले 'या' देशात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 15:29 IST2024-02-05T15:29:15+5:302024-02-05T15:29:50+5:30

भारतात नाही विरुष्का परदेशात देणार बाळाला जन्म? चर्चेला उधाण

anushka sharma and virat kohli planning to have their second baby in london | अनुष्का शर्मा-विराट कोहली भारताबाहेर; दुसऱ्या बाळाच्या जन्मासाठी पोहोचले 'या' देशात?

अनुष्का शर्मा-विराट कोहली भारताबाहेर; दुसऱ्या बाळाच्या जन्मासाठी पोहोचले 'या' देशात?

बॉलिवूडचं सेलिब्रिटी कपल अनुष्का शर्मा आणि विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. अनुष्का आणि विराट दुसऱ्यांदा आईबाबा होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर एबी डेव्हिलियर्सने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला. विराटला त्याच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायचा आहे, असंही डेव्हिलियर्सने सांगितलं होतं. त्यानंतर आता पुन्हा अनुष्का आणि विराट चर्चेत आले आहेत. 

अनुष्कासाठी विराटने इंग्लंड विरुद्धच्या दोन टेस्ट सामन्यांवरही पाणी फेरलं आहे. दुसऱ्यांदा गरोदर असलेल्या अनुष्काबरोबर विराट वेळ घालवत आहे. सध्या विराट आणि अनुष्का सगळ्यांपासून दूर लंडनमध्ये असल्याचं समोर आलं आहे. आणि लंडनमध्येच विरुष्का त्यांच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार असल्याचंही बोललं जात आहे. अद्याप विराट-अनुष्काने दुसऱ्यांदा आईबाबा होणार असल्याच्या वृत्तावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. पण, विराट आणि अनुष्का लंडनमध्येच दुसऱ्या बाळाला जन्म देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

विराट-अनुष्काने २०१७ साली लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. एक आदर्श कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. लग्नानंतर ४ वर्षांनी अनुष्काने गोंडस लेकीला जन्म दिला. विराट-अनुष्काच्या लेकीचं नाव वामिका असं आहे. विराट-अनुष्का कॅमेऱ्यापासून त्यांच्या लेकीला दूर ठेवणं पसंत करतात. त्यांनी अद्याप लेकीचा चेहरा मीडियाला दाखवलेला नाही. आता विरुष्का दुसऱ्यांदा आईबाबा होणार असल्यामुळे चाहतेही आनंदी आहेत. 

Web Title: anushka sharma and virat kohli planning to have their second baby in london